डास निमर्मूलन करताना पालिका कर्मचारी 
मुंबई

...अलिबागमध्ये आता बिनधास्त फिरा

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : अरबी समुद्राचे सान्निध्य लाभलेले शहर, पर्यटकांसाठीचे नंदनवन अशा बिरूदावली मिरवणाऱ्या अलिबागमधील रहिवासी डासांमुळे हैराण झाले आहेत. या समस्येमुळे संध्याकाळनंतर घराबाहेर पडणेही त्यांना नकोसे होते. या संदर्भातील तक्रारी पालिकेकडे वारंवार केल्या आहेत. त्याची दखल घेत पालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डासनिर्मूलन फवारणी सुरू केली आहे. ‘मॉस्कुटो मिशन’ असा उपक्रम आहे.
 
हे वाचाच : चालाल तर चालाल

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये पर्यटकांचाही मोठा राबता असतो. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेविषयी वारंवार चर्चा होते. काही महिन्यांपासून या शहराला डासांनी त्रस्त केले आहे. रहिवाशांबरोबरच पर्यटकांनीही याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे पालिकेने ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार  ‘मॉस्कुटो मिशन’ सुरू केले असून व्हीडीके कंपनीला डास निर्मूलनाचे कंत्राट देण्यात आले आहे. या मोहिमेवर महिन्याला सुमारे तीन लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही कंत्राटदार कंपनी दोन पद्धतीने शहरामध्ये ठिकठिकाणी फवारणी करणार आहे. डासनिर्मूलनाचे नवीन पद्धतीचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले आहे.

अलिबाग शहरातील डासनिर्मूलनासाठी दर दहा दिवसांनी फवारणीचे काम करण्यात येते. त्यामुळे डासांची अळी वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. या फवारणीचा महिनाभरात परिणाम दिसून येईल. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी महेश चौधरी आणि पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करूनच ही मोहीम हाती घेतली आहे. 
- मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्षा

शहरातील डासनिर्मूलनासाठी अलिबाग पालिकेने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. परंतु या फवारणीचा मानवी आरोग्यावर काही परिणाम होणार नाही ना, याची खात्री पालिकेने करणे आवश्‍यक आहे. शहरातील नागरिकांपर्यंत या उपक्रमाबाबत जनजागृती निर्माण करणे आवश्‍यक आहे. 
तरच ही मोहीम यशस्वी होईल.
- किशोर अनुभवणे, रहिवाशी, अलिबाग

शहरातील डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अलिबाग पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक साधनसामग्रीच्या आधारे डासफवारणी सुरू केली आहे. महिनाभरात चांगले परिणाम दिसून आल्यास हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. 
- महेश चौधरी, मुख्याधिकारी, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT