महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट मिळाली आहे. नागपूरनंतर आता अजित पवारांना अमरावती मधूनही क्लिन चीट मिळालीये. दरम्यान अजित पवारांवर भाजपेने केलेले आरोप राजकीय हेतून प्रेरीत होते हे आता स्पष्ट झाल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला असा दावा भाजप करत होतं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला, चौकशी देखील झाली. मात्र यातून काहीच निघालं नाही. याचिकाकर्त्यांनी सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा कुठलाही रोल नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. आम्ही आधीपासून सांगत होतो अजित पवार यांचा घोटाळ्यात सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलीये.
महत्त्वाची बातमी : मुंबईत पुन्हा हिट अँड रन, 23 वर्षीय तरुणी जागीच ठार..
दरम्यान, या क्लिनचीट मुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. अमरावती विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्रही दाखल केलंय. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. कायदेशीर तपासणीमध्ये अजित पवार यांना कोणत्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही, असं यातून सांगण्यात आलंय. त्यामुळे अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते असं नवाब मलिक म्हणालेत.
Webtitle : all allegation related to Irrigation scam on ajit pawar were nothing but political agenda of BJP says nawab malik
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.