मुंबई

मोठी बातमी: मध्यवैतरणा धरणाचे पाचही दरवाजे उघडले!

सकाळ वृत्तसेवा

Latest Palghar News: मोखाड्यात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात ही त्याचा परिणाम झाला आहे. मुंबई ला पाणी पुरवठा करणारे मोखाड्यातील मध्यवैतरणा धरण तुडुंब भरले आहे.

त्यामुळे धरणाचे स्वयंचलित पाच ही दरवाजे उघडले गेले आहेत. येथुन  11  हजार  124  क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा ईशारा देण्यात आला आहे.          

पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. हवामान खात्याने कोकण किनारपट्टीसह पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला. जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मोखाड्यातील मुंबई ला पाणी पुरवठा करणार्या मध्यवैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

धरणाच्या पाण्याच्या पातळी  284 : 35  मिटर ला पोहोचली आहे. त्यामुळे धरणाचे पाच ही स्वयंचलित दरवाजे  60  सेमी ने ऊघडले गेले आहेत. या धरणातून संध्याकाळी  4 : 30 वाजता सुमारे  11  हजार  124  क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी मोडकसागर धरणात जात असल्याने, मोडकसागर धरणाचा विसर्ग ही वाढवणार आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

28 Four, 18 Sixes! झिम्बाब्वेने T20 मध्ये ठोकल्या तब्बल २८६ धावा! भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

Akhilesh Yadav : भाजपकडून माणसे तोडण्याचे काम : खासदार अखिलेश यादव

Winter Health Care: हिवाळ्यात दिवसभर उत्साही अन् हायड्रेट राहायचंय? मग स्वत:ची 'अशी' घ्या काळजी

Latest Maharashtra News Updates LIVE : निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल

SCROLL FOR NEXT