Danave_Lad 
मुंबई

Ambadas Danve: "बोट उगारल्यास तोडून टाकू"; अंबादास दानवे प्रसाद लाड यांच्यावर संतापले; सभागृहाचं कामकाज स्थगित

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यात पावसाळी अधिवेशनादरम्यान पहायला मिळालं. विधानपरिषदेत यावरुन चर्चा सुरु झाल्यानंतर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं.

यावेळी दानवे यांनी लाड यांना शिवीगाळ करत बोट उगारल्यास तोडून टाकू, असा इशारा दिला. या प्रकारामुळं सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अध्यक्ष निलम गोऱ्हे यांनी सभागृहाच कामकाज स्थगित केलं. (Ambadas Danve got angry on Prasad Lad in Vidhan Parishad over Rahul Gandhi subject then house work adjourned)

नेमकं काय घडलं?

विधान परिषदेत नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द अंबादास दानवे यांनीच पत्रकारांना दिली. त्यांनी सांगितलं की, "माझा तोल सुटलेला नाही. मी शिवसैनिक आहे, बोट तोडण्याचं देखील काम करु शकतो. सभागृहातला तो विषय नव्हता. भाजपचे लोक वेगळ्याच विषयावर गोंधळ घालत होते. राहुल गांधींच्या विषयावर लोक बोलत होते. मी सभापतींना विचारलं हा आपला विषय आहे का? आम्ही एकमेकांशी बोलत नसतो, सभापतींकडे बोलत असतो. मात्र, लाड यांनी माझ्याकडं बोटं दाखवत हातवारे केले.

सभापतींनी त्यांना थांबवण्याचं काम करायचं होतं. भाजपचे सदस्य काहीपण गोष्टी काढतात सभापती ते सहन करतात. आम्ही काही बोललं तर आमच्यावर कारवाई होते" बीजेपी म्हणजे हिंदुत्ववादी नाहीत. मला प्रसाद लाड सारखा बांडगा हिंदुत्व शिकवणार का? माझ्या राजीनाम्यासंदर्भात माझे नेते पाहतील, अशा शब्दांत दानवे यांनी सभागृहात नेमकं काय घडलं याची माहिती दिली.

सभागृहाचं कामकाज स्थगित

दरम्यान, सभापती निलम गोऱ्हे यांनी दोघांनाही समज देण्याचा प्रयत्न केला. यावेळी लाड हे मी बोट दाखवणार असं बोलत असताना तुम्ही हे चुकीचं बोलत आहात असं सभापतींनी त्यांना सांगितलं. पण प्रचंड गदारोळ होत असताना आणि शिवीगाळीची घटना घडल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidansabha: हरियाणा नंतर आता राष्ट्रीय पक्षांचे 'मिशन महाराष्ट्र'; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी करणार दौरे

NA Tax : सोसायट्यांचा ‘एनए टॅक्स’ अखेर रद्द; दोन लाखांहून अधिक सोसायट्यांना दिलासा

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

SCROLL FOR NEXT