CBI Raids on Satyapal Malik Esakal
मुंबई

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांच्याकडं भारतातील बडे उद्योगपती अंबानी यांची एक फाईल सहीसाठी आली होती. या फाईलबाबत मलिक यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोडो अभियान आयोजित जनसभा पार पडली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी देखील उपस्थिती लावली.

मलिक म्हणाले, या लोकांनी ठरवलं आहे की शेती संपवायची, सैन्य संपवायचं. सध्या देशात सरकारी एजन्सीजचा गैरवापर सुरू आहे. मी राज्यपाल म्हणून नियुक्ती झालो त्यावेळी दोन फाईल माझ्या समोर आल्या. यामध्ये एक फाईल ही अंबानी यांची होती. त्यात काही चुकीचं नव्हतं म्हणून मी त्यावर कारवाई करण्यास नकार दिला.

त्यावर मला अधिकाऱ्याने सांगितलं की दीडशे कोटी मिळणार आहेत. मी सांगितलं मला काही नकोय. मी असेपर्यंत असं काहीच होणार नाही. मी दिल्लीत सांगितलं की मला असं काही जमणार नाही. तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्या. त्यावर त्यांनी मला सांगितलं की बरोबर आहे, भ्रष्टाचाराबाबत निष्काळजीपणा चालणार नाही. पण त्या दिवसापासून माझ्यासोबत त्या अधिकाऱ्यांची वागणूकच बदलली. माझ्या गावच्या घरी सीबीआयची टीम चौकशीसाठी पाठवली गेली. माझ्या काकांची मुलं घरी होती, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की घरात भूतं आहेत, त्यानंतर हे अधिकारी पळाले, असा किस्साही यावेळी सत्यपाल मलिक यांनी सांगितला.

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर मलिक म्हणाले, देशात जबरदस्त लढाई सुरू आहे आणि आता तुम्ही जिंकण्याच्या जवळ आला आहात. जर तुम्ही पराभूत होणार असता तर हरयाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक लागली असती.

हरयाणात काँग्रेस 60 जागा तर भाजप 20 जागा जिंकणार आहे. मोदी जर विनासुरक्षा गावात गेले तर काही खरं नाही. या लोकांनी सगळं गहाण ठेवलं आहे, अदानीकडं यांना देशाबाबत काळजी नाही, अशा शब्दांत सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT