crime esakal
मुंबई

Ambarnath Crime: बदलापूरनंतर अंबरनाथ हादरले; नराधमाने 9 वर्षीय मुलीचा शौचालयात केला विनयभंग

Latest Kalyan News: अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Latest Girl Crime News : बदलापूर येथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच अंबरनाथ मधून आता अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 9 वर्षीय मुलीवर शौचालयात नेत तिला अश्लील चित्रफित दाखवत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शेजारी राहणाऱ्या 35 वर्षीय नराधमाने हे कृत्य केले असून याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अंबरनाथ शहरात ही अल्पवयीन मुलगी कुटुंबासह रहाते. पीडित मुलीच्या शेजारीच संतोष कांबळे हा राहण्यास आहे. या ओळखीचा फायदा घेत हा 1 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यत हा प्रकार सुरू होता. 20 ऑगस्टला दुपारी संतोष याने अल्पवयीन मुलीला बहाण्याने सार्वजनिक शौचालयात बोलावले. ती गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याला मुलीने विरोध करताच तिला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून पीडितेने घडलेली घटना आईला सांगितली.

त्यानंतर पीडित मुलीच्या आईने 21 ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी संतोष कांबळे याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी त्याला न्यायालयात हाजर केले असता दोन दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT