Amit Thackeray on Raj Thackeray ESakal
मुंबई

राज ठाकरेंसोबत माझी तुलना कधी होऊ शकत नाही कारण... अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या वडिलांविषयी भावना

Amit Thackeray: अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

Vrushal Karmarkar

राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित ठाकरे याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मध्य मुंबईतील माहीममधून उमेदवारी दिली आहे. यानंतर अमित ठाकरे यांनी आज साम टीव्हीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी राज ठाकरेंविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे आक्रमक आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. तर अमित ठाकरे हे संयमी आहे. यावर अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

वडिलांबद्दल बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले की, ते बेधडक बोलतात. कारण त्यांनी माझ्यापेक्षा अधिक जग पाहिलं आहे. त्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली आहे. त्यांचा याबद्दल विचार मला माहित आहे. त्यांना महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचा हे माहित आहे. मात्र आता खाली पडत चाललेला महाराष्ट्र यामुळे मला त्यांच्या मनातील भावना कळत आहे. त्यांना असं वाटतं की, मला काय करायचं आहे आणि बाहेर काय सुरू आहे. त्यांची आणि माझी कधी तुलना होऊ शकत नाही. मी राजकारणात आता आलो आहे. कालांतराने राज ठाकरेंवर विश्वास ठेऊन लोक सत्ता देतील, तेव्हा मला माहित आहे मी काय करू शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे बेधडक वक्तव्यांमुळे ओळखले जातात. मात्र त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे संयमी असल्याचे वारंवार समोर आले आहे. यावर सांगताना ते म्हणाले, मी शांतपणे बोलतो. मात्र घाबरून बोलत नाही. मी राज साहेबांसारखाच बोलतो. फक्त त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे आणि माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. कारण आम्ही दोघेही खोटं नाही बोलू शकत. मला माहिती आहे ते कशातून गेले आहे. त्यांचा प्रवास आणि धडपड मला माहित आहे. कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झाला पण माझ्या वडिलांचा पक्ष असल्याने तो माझ्यावर नाही झाला. त्यामुळे मी संयमी आहे, असं उत्तर अमित ठाकरेंनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

Virender Sehwag: 'संघात फक्त सेहवागचीच मनमानी होती, त्याने मला...', मॅक्सवेलने पंजाब किंग्स संघातील वातावरणाची केली पोलखोल

SCROLL FOR NEXT