आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील आणखी एका व्यक्तीने निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण केले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे यांना तिकीट दिले आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र ते राजकारणाकडे कसे वळले याची देखील एक गोष्ट आहे. जी आज स्वत: अमित ठाकरे यांनी साम मराठीच्या मुलाखतीत सांगितली आहे.
शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांनी मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला होता. उद्धव ठाकरे सक्रीय होण्याआधी राज ठाकरे मुंबईत पक्षाला सामोरे जायचे. आजही मनसेचा जनाधार मुंबईत आहे. यामुळे याच मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत साम टीव्हीने अमित ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. तसेच मनसेच्या सहा नगरसेवकांवरूनही त्यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यानंतर त्यांची राजकारणातील प्रवेशाचे कारण सांगितले आहे.
अमित ठाकरेंनी सांगितले की, खरंतर मला राजकारणात यायचं नव्हतं. मात्र २०१४ नंतर पक्षाची घसरण झाली. तेव्हा मला वाटलं की, साहेबांनी हिमतीवर पक्ष सुरू केला आहे. इतक्या लोकांच्या जोरावर पक्ष उभा केला आहे. यासाठी आता पक्षाला हातभार लावणं माझी जबाबदारी बनली आहे. त्यानंतर २०१५ मध्ये मी शिवाजी पार्कमधील रोगामुळे झाडं मरत होती. तेव्हा मी आयुक्तांना भेटून निवेदन दिले होते. तसेच यावर उपाय म्हणून एक किडा आणला होता. त्यामुळे ती झाडे वाचली होती.
ते पुढे म्हणाले की, यानंतर तेथील एक आजोबा मला म्हणाले बाळा तू चांगलं काम करत आहेस. ते कुठेतरी माझ्या मनात बसलं. तेव्हा मला वाटलं मी कुठे चुकत नाही आहे. मी जे करतोय त्यांने लोकांना बरं वाटत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येत आहे. ते येणारं हास्य मला आवडलं. तेव्हा मला वाटलं आपला पक्ष तर आहे मात्र आपलं ध्येय्य अजून मोठं आहे. यातून मला राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं आहे. त्यानंतर मी राजकारणात येण्याचं ठरवलं, असं अमित ठाकरेंनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.