Amit Thackeray ESakal
मुंबई

Amit Thackeray: दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत... अमित ठाकरेंनी विषयच संपवला! नेमकं काय म्हणाले?

Amit Thackeray: अमित ठाकरे यांनी साम मराठीला या मुलाखत दिली आहे. यात त्यांनी अनेक वक्तव्य केली आहेत.

Vrushal Karmarkar

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते माहिम या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. याबाबत संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे यांनी साम मराठीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी महाराष्ट्र राजकारण, विधानसभा निवडणूक, ठाकरे कुटुंबाचे संबंध अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यात त्यांनी ठाकरे कुटुंब एकत्र येण्यावर एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

अमित ठाकरे राज ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले, राज ठाकरेंनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी जेव्हा महाराष्ट्रचा दौरा काढला, तेव्हा त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे त्यांना वाटलं आपण राजकारणात राहायला हवं. त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाला होता. हेच कारण असल्याने त्यांनी हा पक्ष काढला, असं अमित ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी दोन ठाकरे भाऊ एकत्र येण्यावर वक्तव्य केले आहे.

मनसेचे नगरसेवक फुटले होते. त्यानंतर शिवसेना फुटली. दोन गट निर्माण झाले आहेत. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, आता जे बोलत आहेत ना आजारी असताना ४० आमदार फोडले. ते तेव्हाही फोडले होते. तेव्हा तुम्हाला नाही वाटलं का हे चुकीचं करत आहोत. वडील म्हणून माझा साहेबांवर विश्वास आहे. ६ नगरसेवक गेले ते १०० उभे करू शकतात. त्यांना तो फरक नाही पडत. मात्र त्यांनाही कुठेतरी वाईट वाटलं असेल. तेव्हा माझ्या डोक्यात आलं आता हे दोन भाऊ एकत्र नाही येणार. २०१७ नंतर ते माझ्या डोक्यातूनही आता संपलं आहे. आता माझ्याकडून असं वाटणं संपलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vidhansabha Election : पुण्यात पुन्हा धंगेकर विरूद्ध रासने! विधानसभेला भाजपकडून जुन्याच चेहऱ्यांना संधी

IND vs NZ Test: ४३३१ दिवस, १२ वर्षे अन् १८ मालिका... अखेर टीम इंडिया मायदेशात हरले! एकदा आकडेवारी पाहाच

Murlidhar Mohol on Manoj Jarange : जरांगे पाटलांचा राग फडणवीसांवर नाही तर... मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले

राज ठाकरेंसोबत माझी तुलना कधी होऊ शकत नाही कारण... अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या वडिलांविषयी भावना

Vasai Assembly Election 2024 : वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ...

SCROLL FOR NEXT