vaibhavi kharatmol sakal media
मुंबई

कोरोनाने बाबा गेले, ११ वर्षाच्या वैभवीवर आली मासेविक्रीची वेळ

सायन येथील साधना विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे

नरेश शेंडे

मुंबई: कोरोना माहामारीमुळं (Corona Pandemic) संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे. या जीवघेण्या विषाणूमुळं (Corona Kills) संपूर्ण कुटुंब उद्धवस्त ( Family Collapse) झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. संसार प्रपंचाचा गाडा हाकणारे अनेक कुटु्ंप्रमुख कोरोनाच्या संसर्गाला बळी ठरले आहेत. धारावीतील अशाच एका कुटुंबप्रमुखाला (Dharavi Family) कोरोनामुळं आपले प्राण गमवावे लागेल. धारावीतील एका कुटुंबावरही असचं संकट ओढवलं. त्यांनी कुटुंबाचाच मासेविक्रीचा व्यवसाय (Fish Selling Business) पुढे नेला. धारावीत राहणाऱ्या एका कुटुंबाने दैनंदिन रोजीरोटी मिळावी म्हणून मासे विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. कोविडमुळं बाबांचं निधन झाल्यामुळं धारावीतील 11 वर्षांच्या चिमकुलीने आईच्या खांद्याला खांदा लावत मासे विक्री सुरु केली आहे. वैभवी खरतमोल (Vaibhavi Kharatmol) असं या मुलीचं नाव आहे. ( An eleven year old vaibhavi kharatmol sells fish after passes her father in corona Pandemic)

वैभवी मुंबई महानगरपालिकेच्या सायन येथील साधना विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे. कोरोनाचं संकट येण्यापूर्वी वैभवीच्या घरी सर्व व्यवस्थित सुरु होतं. मात्र, कोरोना महामारी आल्यानंतर तिच्या कौटुंबिक जीवनात संकटं आली. वैभवीचे वडिल मासे विकायचे. मागच्यावर्षी पहिल्या लाटेत एप्रिल महिन्यात कोरोनाने त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर संसाराचा गाडा हाकायला वैभवीच्या आईने सुरुवात केली. मासे विक्री व्यवसायाचा अनुभव नसल्याने वैभवीच्या आईला इतर मासे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची मदत घ्यावी लागली. आपली आई एका अनोळखी जगात आहे. तिला मदत केली पाहिजे या भावनेतून वैभवीने तिच्या आईसोबत मासे विकायला सुरुवात केली. वैभवी मासे स्वच्छ करते आणि मासे विकत घेण्यासाठी ग्राहकांसोबत संवाद साधते.

आत्ता वैभवीची ऑनलाईन शाळा सुरु झाली आहे. त्यामुळे सकाळच्या फावल्या वेळात ती तिच्या आईला मासे व्यवसायात मदत करत आहे. वैभवीला ऑनलाईन लेक्चरसाठी तिची मोठी बहीण आणि नातेवाईक मोबाईलद्वारे मदत करत असतात. माझ्या आईला नोकरीची गरज आहे. तिला नोकरी मिळेल अशी आशा आहे, अशी कौटुंबिक व्यथा वैभवीने यावेळी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT