jitendra awhad and anand paranjape 
मुंबई

Thane: "..तर समजेल जिल्ह्याचे नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का ?" आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अट्टाहास करून भिवंडीची जागा मिळविणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा प्रचार करावा. निकालाच्या दिवशी त्यांना कळेल की, जिल्ह्याचे नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला.

राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पक्षात इतके मोठे योगदान आहे की, त्यांच्याविषयी बोलण्याची जितेंद्र आव्हाड यांची कुवत नाही. जितेंद्र आव्हाड हे आमच्या नेत्यांचा उल्लेख सूर्याची पिसाळ आणि खंडू खोपडे असा करतात. पण, राष्ट्रवादी पक्षामधले सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे हे आव्हाड आहेत, असा आरोप देखील आनंद परांजपे यांनी केला.

तसेच आव्हाड यांच्या जाचाला कंटाळूनच अनेकांनी पक्ष सोडून गेले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी खडसे यांना जाऊन विचारावे की, त्यांना शरद पवार यांनी काय कमी केले.

पुढे ते म्हणाले, आव्हाड यांनी आरोप करण्याऐवजी या सर्व प्रश्नांबाबत शरद पवार यांच्याकडे विचारणा करावी. २०१४ मध्ये विधानसभेचा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठींबा कुणी द्यायला लावला.

२०१६ मध्ये भाजपच्या शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या बैठका झाल्या, त्या आपल्या मान्यतेने झाल्या का आणि २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी कुणाच्या आर्शीवादाने झाला आणि कुणामुळे राष्ट्रपती राजवट उठविली गेली. २०२२ मध्ये सत्तांतर होत असताना कोणत्या चर्चा झाल्या, असे सर्व प्रश्न आव्हाड यांनी शरद पवार यांना विचारले तर अधिक संयुक्तिक होईल, असा टोला परांजपे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT