Anant Radhika Wedding Mumbai Police Issue Traffic Advisory  
मुंबई

Anant Radhika Wedding : लग्न अनंत राधिकाचे, पण इम्पॅक्ट मुंबईतील वाहतुकीवर; मार्गात अनेक बदल

या लग्न सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या विवाह सोहळ्याला जगभरातील व्हिव्हिआयपी, बॉलिवूड आणि राजकारणातील मोठ्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे दोनचं दिवस उरले आहे. अनंत राधिका 12 जुलैला सातफेरे घेणार आहेत. या विवाह सोहळ्याला जगभरातून व्हिव्हिआयपी येणार आहेत. त्यामुळे, त्यांच्या या लग्न सोहळ्याचा इम्पँक्ट मुंबईतील वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळाला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल केला आहे. बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध असणार आहे.(Anant Radhika Wedding Mumbai Police Issue Traffic Advisory )

या लग्न सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या विवाह सोहळ्याला जगभरातील व्हिव्हिआयपी, बॉलिवूड आणि राजकारणातील मोठ्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. लग्नातील पाहुण्यांची मंदियाळी पाहता मुंबईमधील वाहतुकीच्या मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली आहे. वाहतुकीसंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध हे 12 ते 15 जुलैसाठी करण्यात आले आहेत. 12 ते 15 जुलै 2024 या कालावधीत दुपारी 1 ते 12 मध्यरात्री दरम्यान सामान्य लोकांना प्रवेश प्रतिबंधित असेल. असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या रस्त्यांवर सर्वसामान्यांना प्रवेश बंदी असेल

मुंबई वाहतूक पोलिसांनी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान सकाळी 1 ते मध्यरात्री 12 पर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरजवळ वाहतूक वळवण्यात आली आहे. लक्ष्मी टॉवर जंक्शन ते धीरूभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन-3, इंडियन ऑइल पेट्रोल पंप आणि डायमंड जंक्शन ते कुर्ला एमटीएनएल रोडवरील हॉटेल ट्रायडंटपर्यंत सर्वसामान्यांना प्रवेश मिळणार नाही.

त्याऐवजी, लोकांना लक्ष्मी टॉवर जंक्शनच्या वन बीकेसीपासून उजवीकडे वळावे लागेल आणि नंतर डायमंड गेट क्रमांक 8 मार्गे नाबार्ड जंक्शनमधून उजवीकडे वळावे लागेल आणि नंतर डायमंड जंक्शनवरून धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या दिशेने जावे लागेल .

याशिवाय धीरूभाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यू, कुर्ल्याहून इंडियन ऑईल पेट्रोल पंप, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन आणि डायमंड जंक्शनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार नाही. या तीन दिवसांमध्ये लोकांना नाबार्ड जंक्शनपासून उजवीकडे वळावे लागेल आणि डायमंड गेट क्रमांक 8 मधून पुढे जावे लागेल. यानंतर लक्ष्मी टॉवर जंक्शनवरून उजवीकडे वळून बीकेसीकडे जा.

या रस्त्यांवर निर्बंध असतील

याशिवाय भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क आणि गोदरेज बीकेसी येथून अमेरिकन दूतावासाकडे येणाऱ्या गाड्यांनाही या तीन दिवसांत बंदी घालण्यात आली आहे. एमटीएनएल जंक्शन बाजूकडील जिओ कन्व्हेन्शन सेंटरचे गेट क्रमांक २३ तीन दिवस बंद राहणार आहे. या गाड्या कौटिल्य भवन येथून वळवण्यात आल्या आहेत. याशिवाय अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंतचा लतिका रोड वन-वे करण्यात आला आहे. याशिवाय कौटिल्य भवन ते अमेरिकन वाणिज्य दूतावासापर्यंतचा एव्हेन्यू 3 रस्ताही एकेरी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT