Viral Video Sakal
मुंबई

Video : "प्लॅटफॉर्म तिकीट 1000 रूपये करा"; अंधेरी स्टेशनवर तरूणाचं रील अन् नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडिया सध्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. यावर अनेक विनोदी व्हिडिओ, डान्सचे व्हिडिओ, लग्न, सीसीटीव्ही फुटेज, अपघात, चोरी, गुन्हे, प्राणी पक्ष्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा सोशल मीडियावरील व्हिडिओ समाजासाठी घातक ठरू शकतात. त्यावर नेटकरीसुद्धा आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर भन्नाट डान्स करत असून या तरूणाचा डान्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. त्याच्या या रीलवर मुंबईकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "अशा डान्सरवर बंदी घातली पाहिजे" असंही काही नेटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीटरवरील Roads of Mumbai या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. "भारतीय रेल्वेला आम्ही मागणी करतो की प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत एक हजार रूपये करावी" असं कॅप्शन या व्हिडिओवर लिहिलं आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.

"का? पावसात मोर नाचतोय तर नाचू द्या ना, हा व्यक्ती पाच रूपयांत मिळणारं लोकल ट्रेनचं तिकीट खरेदी करून रील बनवू शकतो, आमच्या रक्तामध्येच जुगाड आहे, इथे प्लॅटफॉर्म तिकीटसुद्धा काढलं जात नाही" अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

SCROLL FOR NEXT