anil deshmukh sakal media
मुंबई

समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीला हजर राहत नाहीत; ईडीची तक्रार

सुनिता महामुनकर

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोपांमुळे (Corruption allegations) अडचणीत सापडलेल्या माजी गृहमंत्री अनील देशमुख (anil deshmukh) यांच्या विरोधात आता ईडीने (enforcement directorate) विशेष न्यायालयात (special court) दावा दाखल केला आहे. वेळोवेळी समन्स (summons) बजावूनही देशमुख चौकशीला हजर राहत नाहीत अशी तक्रार ईडिने केली आहे.

ईडिने देशमुख यांच्या विरोधात मनी लाॅण्ड्रींगच्या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत चार-पाच वेळा त्यांना समन्स बजावले आहे आणि चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण यापैकी एकाही समन्सला देशमुख यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहेत. देशमुख यांच्या विरोधात ईडीने आता भादंवि कलम 174 नुसार सरकारी कामकाजात गैरहजेरी लावणे या आरोपांखाली न्यायालयात अर्ज केला आहे.

या कलमाअंतर्गत एक महिना कारावास किंवा दंडाची तरतूद आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. देशमुख यांचे दोन सहकारी संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडिने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचीन वाझेचा उल्लेख केला आहे. मात्र देशमुख यांना अथवा त्यांच्या कुंटुंबियांंना यामध्ये आरोपी केलेले नाही.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर सीबीआयने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी केली आणि एफआयआर दाखल केला. आता ईडिने यामध्ये तपास सुरू केला आहे. देशमुख यांनी एप्रिलमध्ये पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात त्यांनी अनेक याचिकाही केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT