perpetual Dsouza sakal media
मुंबई

संकटात संधी : भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी 'तिने' सुरु केला केकचा व्यवसाय

फ्लाईट अटेंडन्ट पर्पेच्युअलची यशस्वी झेप

नरेश शेंडे

मुंबई : गतवर्षी मार्च महिन्यात देशभरात कोरोना विषाणूचा (Corona virus) उद्रेक झाला. त्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रासह खासगी उद्योगांनाही कोरोनाची झळ बसली. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय विमान प्रवासही ( Flights stops) कोरोनामुळे बंद झाला. त्यामुळे विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ( Employee Income) रोजगारावर गदा आली. पर्पेच्युअल डिसूझा (Perpetual Dsouza) ही अशाच कर्मचाऱ्यांपैकी एक. ( Animal Activist Perpetual Dsouza excellent social work even in Financial Crisis)

पर्पेच्युअल फ्लाईट अटेंडन्ट होती. पण विमानच बंद झाल्यामुळे तिला बिनपगारी रजा देण्यात आली. पर्पेच्युअलला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. तिने स्वत:च्या घरी 5 कुत्रे आणि 8 मांजरी पाळल्या आहेत. त्याशिवाय ती भटक्या कुत्र्यांनीही खाऊ घालायची. पगार बंद झाल्यामुळे या मुक्या जनावरांचं पालन पोषण कसं करायचं हा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला.

''कोरोना महामारी येण्यापूर्वी माझ्या एअरलाईन कंपनीकडून मला चांगला पगार मिळायचा. त्या मिळकतीमधून माझा कौटुंबिक खर्च, पाळीव प्राण्यांचा तसेच भटक्या कुत्र्यांची काळजी घेणं मला शक्य व्हायचं. पण कोरोना महामारी संकटानं तोंड उघडलं आणि सारं काही उद्धवस्त झालं'' अशी दुख:द भावना पर्पेच्युअल व्यक्त केली.

पर्पेच्युअल केक चांगले बनवता यायचे. तिचा प्रियकर हॅम्पस बर्गक्विस्ट तिच्या केक बनवण्याच्या कौशल्याचं कौतुक करायचा. त्याने तिला प्रोत्साहन दिले. पर्पेच्युअलकडे केक्स बनवण्याचं अफलातून टॅलेंट आहे हे तिच्या पार्टनरला हॅम्पसला माहित होतं. त्यानंतर पर्पेच्युअलने लॅाकडाऊनच्या संकटातही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय सुरु केला. केक्स विक्रीसाठी पर्पेच्युअलने अंधेरी ते बोरिवली असा सायकलप्रवास केला. पर्पेच्युअल आता पूर्णवेळ केकच्या व्यवसायाकडे वळली असून ती आता यातून बऱ्यापैकी पैस कमावतेय तसेच भटक्या प्राण्यांचाही सांभाळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT