मुंबई

Mumbai News: हापूसच्या आंबा नावाने कर्नाटक आंब्याची विक्री केल्यास एपीएमसी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

आंब्याच्या मोसमात कोकणातील हापूस आंब्याला विशेष मागणी असताना काही व्यापाऱ्यांकडून मात्र ग्राहकांची फसवणूक होताना पहायला मिळते आहे|

सकाळ वृत्तसेवा

Vashi News: कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस आंबा बाजारात दाखल झाला. तसेच हापूसच्या नावाखाली इतर आंबे मिसळून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत.(hapus news)

देवगड, रत्नागिरी भागातून ५० हजार पेट्यांची आवक मुंबईतील कृषीउत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) झाली आहे. त्याशिवाय कर्नाटक, केरळ, काहीप्रमाणात उत्तर भारतातूनही आंबा बाजारात आला आहे. आंब्याच्या मोसमात कोकणातील हापूस आंब्याला विशेष मागणी असताना काही व्यापाऱ्यांकडून मात्र ग्राहकांची फसवणूक होताना पहायला मिळते आहे.(maharashtra news mango)

गेल्या आठवड्यात एका व्यापाऱ्याकडून अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची हापूस आंबा म्हणून कर्नाटक आंबा विक्री केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीत भेसळ होत असल्याचा प्रकार अधिक अधोरेखित झाला. त्या अधिकाऱ्याने एपीएमसीत या बाबत सूचना दिल्यानंतर एपीएमसी प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येत आहे.(mango hapus news)

ग्राहकांच्या हापूस आंब्या संदर्भात वाढत्या तक्रारी पाहून एपीएमसी प्रशासनाने एक परिपत्रक काढून त्या परिपत्रकात हापूस आंबा म्हणून कर्नाटक किंवा अन्य आंबा विकणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे. पत्रकात म्हटल्याप्रमाणे फळ बाजार आवारातील व्यापाऱ्यांकडे येत असलेल्या आंबा हा त्या त्या राज्याच्या नावासह आणि आंब्याच्या जाती सह विक्री न करता तो महाराष्ट्रीयन हापूस नावाने बाजार आवारात विक्री होऊन ग्राहकांची फसवणूक करत असतात. फळ बाजार आवारात मोठ्या प्रमाणात आवक होत असलेला आंबा हा ज्या राज्यातून आला आहे.

ज्या नावाने त्याची आवक होईल त्याच नावाने त्याची विक्री करा व त्या आंब्यावर तसे लेबल लावा. तसेच आंबा पिकविण्यासाठी घातक औषधांचा वापर केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यास अगर याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाजार समितीच्या कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.(vashi Market news)

एपीएमसीतील फळ बाजारात जवळपास ६० टक्के व्यापारी हे महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. आंबा विक्रीच्या हंगामात हे व्यापारी एपीएमसीतील गाळा भाडेतत्त्वावर घेऊन व्यापार करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आंब्यांची अदला बदली करण्याचे प्रकार काही व्यापाऱ्यांकडून सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याचे वेष्टण काढून हा आंबा रत्नागिरी, देवगड आंब्याच्या पेट्यांमध्ये भरला जातो. बाजारातील जवळपास ५० टक्के व्यापारी असले प्रकार करत असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक देखील चिंतेत आहेत. बाजार आवारात असले प्रकार घडत असल्याचे आढळून आल्यास आंबा बाजार समितीकडून जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अडत्याची परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यात येईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

" मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीत ज्या राज्याचा आंबा आहे त्याच नावाने विकला जावा आणि आंबा पिकवण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर करू नये अशा सूचना प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.सदर दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास व तशी तक्रार एपीएमसी प्रशासनाकडे केल्यास फळ विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल."

--- संगीता आढांगळे, उप सचिव-फळ बाजार, एपीएमसी

"कोकणातील हापुसचा दर ४ ते ५ डझनच्या पेटीला २-५ हजार रुपये इतका असताना त्यात १००-२०० रुपये किलोने विकला जाणारा कर्नाटक आंबा मिसळून दामदुप्पट पैसे कमावण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच आहे. ग्राहकांनी आंबा विकत घेताना त्याची नीट पारख करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी विश्वासू विक्रेत्याकडूनच आंबा विकत घेण्याला प्राधान्य द्यावे."

--- भाऊसाहेब पाटील, हापूस आंबा व्यापारी (Hapus mango traders)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT