Appointment of 77 official to control illegal constructions in Kalyan-Dombivli mumbai Sakal
मुंबई

Mumbai News : कल्याण-डोंबिवलीत बेकायदा बांधकामे, नियंत्रणासाठी 77 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील वाढत्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका आयुक्तांनी 10 प्रभाग हद्दीत 10 क्षेत्रिय (बीट) निरीक्षक आणि 67 क्षेत्रिय मुकादम नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतला आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेत प्रत्येक प्रभागात क्षेत्रिय कर्मचारी होते.

मात्र या कर्मचाऱ्यांना इतर विभागात कामे दिल्याने बेकायदा बांधकामांवर देखरेख ठेवण्याकडे दुर्लक्ष झाले आणि या बेकायदा बांधकामांचे पेवच फुटले. ही पद्धत पुन्हा अंमलात आल्याने आता तरी बेकायदा बांधकामे रोखली जातात का हे पहावे लागेल.

केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्ती केले होते. प्रभागात सुरू असलेली बेकायदा बांधकामे, चोरीच्या नळजोडण्या यांची माहिती क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकडून साहाय्यक आयुक्तांना दैनंदिन मिळत होती.

साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी प्रभागातील क्षेत्रिय कर्मचारी (बीट कर्मचारी) ही संकल्पना मोडीत काढण्यात आली होती. यातील कर्मचाऱ्यांना फेरीवाला हटाव पथक, देयक वाटप करणे अशा अनेक कामांना जुंपण्यात आले. यामुळे बेकायदा बांधकामांची माहिती मिळणे बंद झाले.

शासनाने 2006, 2009 मध्ये पालिका हद्दीत होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांवर निश्चित केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी पालिकेकडून केली जात नव्हती. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मागील शासकीय आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिका हद्दीत 2 लाखाहून अधिक बेकायदा बांधकामे झाली आहेत. दरवर्षी लहान मोठी आठ हजाराहून बेकायदा बांधकामे होत आहेत. अशाप्रकारे बांधकामे होत राहिली तर शहराचे नियोजन ढेपाळून पडेल.

ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने आता उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि क्षेत्रिय कर्मचारी यांच्यावर प्रभागातील बेकायदा बांधकामे नियंत्रणाची जबाबदारी सोपवत 10 प्रभाग हद्दीत 10 क्षेत्रिय निरीक्षक आणि 67 क्षेत्रिय मुकादम असे 77 कर्मचाऱ्यांची नियुक्ती पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी केली आहे.

यात अ प्रभागात कनिष्ठ अभियंता ओंकार भोईर, ब प्रभागात अधीक्षक भूषण कोकणे, क प्रभागात कनिष्ठ अभियंता संजय आचवले, जे, ड प्रभागात पर्यवेक्षक बिस्तुर मस्कर, फ, ग प्रभाग कनिष्ठ अभियंता राहुल म्हात्रे, ह प्रभागात कनिष्ठ अभियंता सुनील म्हादलेकर, आय प्रभाग कनिष्ठ अभियंता डी. एस. गोरे, 27 गाव ई प्रभाग वरिष्ठ लिपिक गोविंद हंडोरे,

वरिष्ठ लिपिक वैभव सरनोबत यांची क्षेत्रिय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 67 क्षेत्रिय कर्मचारी कार्यरत असून लवकरच हे अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार असून कल्याण डोंबिवली परिसरातील बेकायदा बांधकामांना आळा घालणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली आहे.पालिका आयुक्तांनी केडीएमसी हद्दीतील 10 प्रभाग हद्दीत 10 क्षेत्रिय निरीक्षक आणि 67 क्षेत्रिय मुकादम नियुक्ती केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है"; खोटी दाढी लावून तरुणींची जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाचा Video Viral

Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांना धक्का! राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT