मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमांना प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाने पंचवार्षिक बृहत आराखडा तयार केला असून नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिसभेच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षाचा पंचवार्षिक बृहत आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या बृहत आराखड्यानुसार आता विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्याधारीत शिक्षण मिळणार आहे.
या बृहत आराखड्यात कौशल्याधारीत शिक्षणाबरोबर महिला महाविद्यालय, सॅटेलाईट सेंटर, रात्र महाविद्यालय यांचे स्थानबिंदू निश्चिती करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या बृहत आराखड्यात विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील जिल्ह्याच्या भौगोलिक, सामाजिक व निकडीच्या दृष्टिने कौशल्य ओळखून अभ्यासक्रम सुचविण्यात आले आहेत.
पारंपारिक कला, विज्ञान आणि वाणिज्य विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांच्या ऐवजी आवश्यक असलेल्या कौशल्य अभ्यासक्रमांची महाविद्यालये देण्याची योजना या बृहत आराखड्यात केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकसंख्या आणि तिथे असलेली महाविद्यालये यांच्या अनुषंगानेही बिंदू निश्चिती करण्यात आली आहेत.
या पाच वर्षीय बृहत आराखड्यात निश्चित करण्यात आलेल्या बिंदूनुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या सातही जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्राच्या निकडीनुसार, स्थानिक उद्योगांसाठी आवश्यक असलेली कौशल्य पध्दती, व्यापार व वाणिज्य या संबंधात महिला, विद्यार्थी, मागासवर्ग, आदिवासी जमाती व त्यांच्याशी संबंधित अन्य घटक यांसारख्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या युवकांच्या प्रादेशिक गरजा आणि त्याबाबतच्या युवकांच्या आकांक्षा यासाठी उच्च शिक्षणाच्या सुविधांच्या आवश्यक बाबींसंबंधात सर्वेक्षण करून तथा भागधारकांच्या सूचना यांचा सविस्तर अभ्यास करून हा पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई विभाग, कोकण विभाग, ग्रामीण, शहरी, डोंगरी, आदिवासी, किनारपट्टी अशा विविध विभागांचाही यात सम्यक विचार करण्यात आला.
या बृहत आराखड्यानुसार स्टॉकमार्केट कोर्स, फायनान्शिअल एडवायझरी, जेम्स ज्वेलरी, लॉजिस्टिक एण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, करीअर काऊंसलिंग, क्लिनीकल काऊंसलिंग, इंडस्ट्रीअल सायकोलॉजी, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, कंस्ट्रक्शन अँड अलाईड बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस एनालिटिक्स, डायट अँड हेल्थ मॅनेजमेंट, फिजिकल हेल्थ मॅनेजमेंट, टेक्सटाईल, हँडलूम, डिझायनींग, अग्रो प्रोडक्ट मॅनेजमेंट, फूड सप्लाय चेन, वेअर हाऊस अँड गोडाऊन मॅनेजमेंट, पेंट्स अँड कोटींग, नेटवर्क हार्डवेअर अँड सिक्युरिटी कोर्सेस, सिक्युरिटी अँड एस्टाब्लिशमेंट मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, वेबसर्विसेस मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर सिस्टिम अँड रिसोर्सेस मॅनेजमेंट, फिशरीस्, सीफूड प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग, हॉर्टिकल्चर, गार्डिनिंग अँड नर्सरी, कुकींग-बेकींग, डायटेटिक्स, योगा ब्युटी अँड वेलनेस, क्लाऊड कम्प्युटींग, डेटा ट्रेकिंग, डेटा वेअरहाऊसिंग, डेटा मॅनेजमेंट, इंडस्ट्रिअल सेफ्टी-सिक्युरिटी, मॅन्युअल कंपोस्ट मेकिंग, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, ओशनोग्राफी, अग्रोबेस स्कील कोर्सेस, एंत्रीअरप्रुनरशिप, एंत्रीअरप्रुनरशिप एज्युकेशन, स्माल बिझनेस मॅनेजमेंट, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मार्केटिंग, हँडिक्राफ्ट, इन्वेंटरी अँड वेअरहाऊस मॅनेजमेंट, इंडस्ट्रीअल रिलेशन अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, शिप बिल्डींग अँड मेंटेनन्स मॅनेजमेंट, लेदर आयटम्स मेकींग, फिशरीज फिश कंझरवेशन, ड्राय फिश मेंकींग, ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, फ्रायट मॅनेजमेंट, इन्फास्ट्रक्चर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, होम अप्लाइंसेस रिपेअर अँड मेंटेनन्स, बीकिपींग अँड मॅनेजमेंट, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, स्पाईस प्लॅन्टेशन अँड कंझर्वेशन असे विविध नाविण्यपूर्ण कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम या पंचवार्षिक बृहत आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत.
सन २०२०-२१ चा वार्षिक लेखा परीक्षण अहवाल अधिसभेत मंजूर त्याचबरोबर २१ जून २०२३ रोजी पार पडलेल्या अधिसभेत मुंबई विद्यापीठाचे सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे, ३१ मार्च २०२१ चे ताळेबंद व मे. एन बी एस अँड कंपनी (सी. ए.), मुंबई विद्यापीठाचे सांविधिक लेखा परीक्षक यांनी सादर केलेले लेखापरीक्षण अहवाल अधिसभेने मंजूर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.