मुंबई

भीमाशंकर अभयारण्यातील 42 गावांचा परिसर 'इको सेन्सिटिव्ह झोन' म्हणून जाहीर

मुरलीधर दळवी

मुरबाड - भीमाशंकर अभयारण्य  परिसरातील ठाणे, पुणे, रायगड या तीन जिल्ह्यातील 42 गावांचा परिसर केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन (पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) म्हणून जाहीर केला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त 15 गावे मुरबाड तालुक्यातील असून त्या खालोखाल रायगड  जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील 11, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील 8, जुन्नर तालुक्यातील 5 व खेड तालुक्यातील 3 गावांचा परिसर सामाविष्ट आहे.

भीमाशंकर अभयारण्य परिसरातील पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण व जल वायू परिवर्तन मंत्रालयाने नुकतीच 5 ऑगस्ट रोजी ही अधिसूचना  काढली  आहे  स्थानिक लोकांचा विरोध डावलून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील डोंगर न्हावे, जांभूर्डे, खानिवरे, साकुर्ली, नारीवली,  उचले, देहरी, खोपीवली, मिल्हे, दुधनोली, उमरोळी खुर्द, दुर्गापूर, मढ, रामपूर व पळू या 15 गावातील ग्रामस्थांवर यामुळे काही बंधने येणार आहेत. तर या क्षेत्रात असलेले सिद्धगड, गोरखगड सारखे किल्ले, लेणी, निसर्ग सौंदर्य, हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक यामुळे आगामी काळात या भागातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्याची शक्यता आहे.

संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या गावांतील दगड, मातीच्या खाणी, विट भट्टया बंद कराव्या लागणार आहेत.  डोंगर उताराचे संरक्षण करण्यासाठी तेथे कोणत्याही बांधकामाला परवानगी मिळणार नाही. अस्तित्वातील रस्ते रुंदीकरण व मजबुतीकरण करणे, नवीन रस्ते तयार करणे, पायाभूत व नागरी सुविधांचा बांधकाम व नुतनीकरण  तसेच प्रदूषण न करणारे लघु उद्योग स्थानिकांना रोजगार देणारे इको टुरिझम ,होम कॉटेजसारखे व्यवसाय पूर्व परवानगी घेऊन करता येणार आहेत. 

area of ​​42 villages in bhimashankar sanctuary declared as eco sensitive zone

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT