army day weapons exhibition army war student officials others visited navi mumbai Sakal
मुंबई

Army Day : आर्मी डे निमित्त आयोजित शस्र प्रदर्शनात बच्चे कंपनीपासून थोरांनी हाताळली युद्धातील सैनिकांची शस्रे

सैनिकांकडून युद्धात प्रत्यक्षात वापरण्यात येत असलेले अत्याधुनिक शस्रे लहानांपासून ते थोरापर्यंत सर्वांनाच प्रत्यक्ष हाताळण्याची संधी सोमवारी मिळाली

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सैनिकांकडून युद्धात प्रत्यक्षात वापरण्यात येत असलेले अत्याधुनिक शस्रे लहानांपासून ते थोरापर्यंत सर्वांनाच प्रत्यक्ष हाताळण्याची संधी सोमवारी मिळाली. कोकण भवन मधील शासकीय /निमशासकीय माजी सैनिक संघटनेने थल सेना दिनानिमित्त (आर्मी डे) शस्र प्रदर्शनाचे आयोजन करुन हि संधी सर्वांनाच उपलब्ध करुन दिली होती.

या शस्र प्रदर्शनाला कोकण भवन मधील शेकडो शासकीय अधिकारी कर्मचाऱयांसह विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनात ठेवण्यात आलेली सर्व अत्याधुनिक शस्रे हाताळून वेगळ्याच प्रकारचा अनुभव घेतला.

कोकण भवन मधील शासकीय /निमशासकीय माजी सैनिक संघटनेच्या (कोंकण विभाग) वतीने सोमवारी थल सेना दिनानिमित्त (आर्मी डे) एक दिवस सैनिकांसाठी या संकल्पनेतून कोकण भवन मध्ये शस्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कुलाबा मुंबई येथील आर्मी स्टेशन मुख्यालयाच्यावतीने लावण्यात आलेल्या या शस्र प्रदर्शनात सैनिकांकडून युद्धात प्रत्यक्षात वापरण्यात येत असलेल्या अत्याधुनिक शस्रे ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे सर्वांनाच हि शस्रे प्रत्यक्ष हाताळुन पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

त्यामुळे बच्चे कंपनीपासून ते शासकीय अधिकारी कर्मचाऱयांनी हि अत्याधुनिक शस्रे स्वत: प्रत्यक्ष हाताळुन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला. या प्रदर्शनाला कोकण भवनमधील अधीकारी कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थी व बच्चे कंपनीनी भेट दिली.

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण मुंबईचे सदस्य रमेश जैद व शासकीय /निमशासकीय माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी अजित न्यायनिर्गुणे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात आर्मी डे निमित्त कोकोण भवनमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

राज्य रक्त संकलन परिषद (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबीरात कोकण भवन मधील अधिकारी कर्मचारी, पोलीस व इतर संस्था संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱयांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले.

रक्तदान करणाऱया रक्तदात्यांना माजी सैनिक संघटनेच्या वतीने ट्राफि, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई,ठाणे व नवी मुंबईतील माजी सैनिक मोठया संख्येन उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT