मुंबई

जामीन मिळाला तरी अर्णब गोस्वामींना होऊ शकते पुन्हा अटक; पोलिसांनी नोंदवले डजनभर गुन्हे

महेंद्र दुसार

अलिबाग : रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी मुंबई हायकोर्टाने अंतरिम जामीन फेटाळताना अनेक निरिक्षणे नोंदविली आहेत. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2018 मध्ये अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल चुकीच्या पद्धतीने बंद केली होती. त्याचबरोबर तपास यंत्रणेला सहकार्य न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, राजकीय दबाव टाकणे यासारखे अनेक बाबींमुळे अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेची मुदत वाढतच जात आहे.

मुंबई हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर मंगळवारी अलिबाग सत्र न्यायालयानेही जामीनावर चर्चा करण्यास नकार दिला. अर्णब यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारनेही राज्य सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निकाल द्यावा असे कॅव्हेट राज्य सरकारने दाखल केले आहे. अलिबाग सत्र न्यायालयात पोलिसांनी पोलिस कोठडी मिळण्यासाठी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण याचिकेवर युक्तीवाद सुरु आहे. चार दिवसात सत्र न्यायालयाने यावर निर्णय घेणे अपेक्षीत आहे. निष्णात कायदेपंडितांच्या मदतीने अर्णब गोस्वामी ही कायदेशीर लढाई लढत आहेत. 4 नोव्हेंबर रोजी अर्णब यांची झालेली अटकच बेकायदेशी असल्याचा युक्तीवाद अर्णबच्या वकिलांचा होता. न्यायालयाने ही अटक कायदेशीर असल्याचे मत नोंदवताना पोलिसांना आरोपींची प्रत्येक दिवसी तीन तास चौकशी करण्याची मुभा दिली आहे.

लवकरात लवकर जामीन मंजूर होण्यासाठी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या 5 नोव्हेंबरच्या दोन आठवड्याच्या न्यायालयीन कोठडीच्या निकालाकडे दुर्लक्ष करीत मुंबई हायकोर्ट आणि आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात केला जात असल्याची आवई उठवत अर्णब गोस्वामीच्या सुटकेसाठी संपुर्ण देशभर आंदोलन छेडले जात आहे. यामुळे न्यायव्यवस्थेला देखील अतिरिक्त कामकाज करुन लवकारात लवकर निर्णय देण्याचा दबाव वाढू लागला आहे.

राजकियदृष्ट्या संवेदनशील झालेल्या या प्रकरणावर न्यायालयाही आठ तासाहून जास्त वेळ या एका प्रकरणावर कामकाज चालवाले लागत आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार जरी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामीला काही प्रमाणात दिलासा मिळाला तरी अन्य पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अन्य गुन्ह्यात पोलिस केव्हाही अर्णबला ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळे अर्णब गोस्वामीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
*
यापुर्वी दाखल असलेले गुन्हे
1.अर्णब गोस्वामीला 4 नोव्हेंबरला मुंबईतील रहात्या घरातून अर्णब गोस्वामी यास ताब्यात घेत असताना शासकीय कामात अढथळा निर्माण करणे, महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणे यासाठी अर्णब आणि त्याची पत्नी संभ्रात गोस्वामी, मुलगा आणि दोन इतरांविरुद्ध मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये   सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी झालेला हल्ला, शांततेचा भंग करण्याचा हेतुपुरस्सर अपमान  आणि 606 अंतर्गत एफआयआर दाखल आहे.

2.लॉकडाउन कालावधीत रिपब्लिक वाहिनीवरील 'पुछता है भारत' या कार्यक्रमात तसेच चर्चासत्रामध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्यामुळे गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गोस्वामी यांना अटक टाळण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणार नसल्याचे लेखी बंधपत्र द्यावे लागणार असून, जामीन म्हणून दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. 

3. मुंबई पोलीस दलात असंतोष असून, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आदेश कुणीही पाळत नाही, असे वृत्त प्रसारित 
केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अँकरसह सहा जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांचे जबाब नोंदविण्यात आले.

4. दोन समुदायात तेढ निर्माण केल्याप्रकणी गुन्हा रिपब्लिक इंडिया या वृत्त वाहिनीवर 22 एप्रिल रोजी पालघर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येच्या बातमीच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना अर्णब गोस्वामी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली. यासंदर्भात त्यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

5. वांद्रे स्थानकावर जमलेल्या गर्दीचा संबंध मस्जिदशी जोडण्यात आला. ही घटना 14 एप्रिल रोजी घडली होती. यातही दोन समाजात तेड निर्माण केल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

6. टीआरपी वाढविण्याचा घोटाळ्यात इतर वाहिन्यांबरोबर रिपब्लिक इंडियांच्या वाहिनीचे नावही समोर आले आहे. आरोपींनी रिपब्लिककडून पैसे घेतल्याचे कबूल केले असल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले. रिपब्लिक वाहिनीतील अनेकांचे जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आले.

Arnab Goswami may be re-arrested on bail; Police reported dozens of crimes

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT