मुंबई

तिघाडी सरकारच्या अहंकारी निर्णयामुळे मेट्रोबाबत मुंबईकरांच्या माथी दिरंगाई; भाजपची टीका

कृष्ण जोशी


मुंबई ः मेट्रो कारशेड कांजूरमार्ग ला हलविण्याचा निर्णय अहंकारी पद्धतीने घेतल्यामुळे मुंबईकरांना दुष्परिणामांचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मिठागर आयुक्तांची परवानगीच घेतली नव्हती असे उघड झाले आहे. लटकवणे, अडकवणे व भटकवणे हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी कांजूरमार्गच्या कारशेड जमिनीच्या वादावरून ठाकरे सरकारवर केली आहे. 

ही जागा केंद्र सरकारच्या मालकिची असल्याचा फलक तेथे केंद्राने लावल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडचा व पर्यायाने मेट्रो प्रकल्पही रखडेल अशी भीती निर्माण होत आहे. मात्र भाजप नेत्यांनी यासंदर्भात ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांच्या माथी दिरंगाई लादली आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड आरे मधून कांजूरमार्ग येथे नेले तेव्हाच यातून सरकारचा वाईट हेतू दिसतो, असा इशारा आम्ही दिला होता. ही जागा कारशेडसाठी आपल्या नावावर करताना मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का, असेही आम्ही तेव्हा विचारले होते, असेही शेलार यांनी दाखवून दिले आहे. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसिद्धीस दिला आहे. 

मेट्रोबाबत ठाकरे सरकारची कार्यपद्धती तिघाडी प्रकारची आहे. जनतेला लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असे सरकारतर्फे केले जात आहे. आधी मेट्रोसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई करून जनतेला लटकवण्यात आले. मग कांजूरमार्ग ची मिठागरांची जागा आपल्या नावावर करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केली नाही, त्यासाठी मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली नाही व असे करून प्रकल्प अडकवण्यात आला. त्यानंतर चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे म्हणजेच भटकवणे हे तंत्र आघाडी सरकार वापरीत आहे. उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय वरील तीन बाबीच दाखवून देतो. यामुळे मुंबईकरांच्या माथी दिरंगाई थोपण्यात आली असून याबद्दल सरकारच दोषी आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

The arrogant decision of the state government has delayed Metro BJPs criticism

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT