Juhi Chawala Team esakal
मुंबई

आर्यन खानसाठी जुही जामिनदार राहिली म्हणजे नक्की काय?

जुहीने आर्यनच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केली याचा अर्थ असा आहे की...

दीनानाथ परब

मुंबई: आर्थर रोड कारागृहातून (arthur road jail) आर्यन खानची (aryan khan) आज काही वेळात सुटका होईल. आर्यनच्या सुटकेमध्ये शाहरुख खानची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावलाने (juhi chawla) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाहरुख आणि जुहीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार बनली आहे. जुही चावलाने शुक्रवारी सेशन कोर्टात (session court) जाऊन १ लाख रुपयाच्या जामीन हमीपत्रावर म्हणजे बेल बाँडवर स्वाक्षरी केली.

जुहीने आर्यनच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केली याचा अर्थ असा आहे की, आर्यन खान जर बेल बाँडची रक्कम भरु शकला नाही, तर त्याला सर्वस्वी कायदेशीररित्या जुही चावला जबाबदार असेल. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आर्यनच्या सुटकेचे कागद पाठवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची होती.

'अब बस बच्चा घर आ जाये', अशी जुहीने प्रतिक्रिया दिली. जुही चावला ५३ वर्षांची आहे. शाहरुख सोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. आयपीएलमधील केकेआर संघाचे दोघेही मालक आहेत. आर्यन खान आणि जुही चावलाची मुलगी जान्हवी दोघेही नुकतेच आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT