राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल(सोमवारी) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण आणि काँगेसचे नेते आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.(Ashok Chavan enters bjp in presence of Devendra fadnavis)
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाणांच्या प्राथमिक सदस्य पत्रावर बावनकुळे यांनी सही करत भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातील एक मोठे नेतृत्व आज आमच्यासोबत आलं आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा गाजवली. अनेक मंत्रीपद भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहता आली. ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.
आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा
अशोक चव्हाण यांनी काल (१२ फेब्रुवारी रोजी) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा चर्चा केली होती. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आले होते. त्यांनी काल आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. त्यावेळी अशोक चव्हाण यांच्यातील नेतृत्व गुण विकसित झाले. या काळात तरूणांना एकत्र करण्यात अशोक चव्हाण यशस्वी झाले. 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी स्वीकारली. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. पुढे 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. ऑगस्ट 2023 ते आजपर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्रातील प्रमुख नेते अशी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत गेले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव राहिले आहेत.
यानंतर 2003 मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. 2008 मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने 2010 त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. 2015 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते
1987-1989 या काळात अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जिंकून आले. 1992 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. 1993 साली सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून ते सरकारमध्ये सामील झाले. 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्रिपदाची जबाबदारी दिली. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.