मुंबई

Mumbai Trans Hbr Link: सागरी सेतूवर वाहनांना वेगमर्यादा किती असेल? तर कोणत्या वाहनांना असेल बंदी? घ्या जाणुन

सागरी सेतूवर वाहनांची वेगमर्यादा व बंदीची तपशीलवार माहिती

Chinmay Jagtap

Mumbai Trans Hbr Link: तब्बल २२ किलोमीटर लांबीचा 'अटल बिहारी वाजपेयी नाव्हा शेवा अटल सेतूचे लोकार्पण शुक्रवारी (ता.१२) पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या सागरी सेतूवरची वाहनांसाठीची वेगमर्यादा मुंबई वाहतूक पोलिसांनी निश्चित केली आहे. १०० किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा सर्व चारचाकी वाहनांसाठी ठेवण्यात आली आहे. या सेतूवर दुचाकी, आटोरिक्शा, ट्रॅक्टर सारख्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगात १२ व्या क्रमांकाचा या सागरी सेतूवर कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनिबस, बस या सर्व वाहनांना परवानगी असणार आहे. मात्र या वाहनांची वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रति तास आखून देण्यात आली आहे.

सागरी सेतूच्या चढताना आणि उतरतानाची वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूवर अपघात आणि वाहतूकीतील अडथळे टाळण्यासाठी वेगमर्यादा आखून देण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक, बस या सारख्या अवजड वाहनांना पुर्व दृदगती मार्गावर प्रवेश नाही. मात्र या वाहनांना सागरी सेतूवर परवानगी आहे. त्यामुळे हा मार्गावर येण्यासाठी वाहनाचालकांना मुंबई पोर्ट-शिवडी एक्झिट मार्ग तसेच एमबीपीटी मार्गाचा वापर करुन उड्डाणपूलावर चढावे लागणार आहे.

या वाहनांना बंदी

मोटरसायकल, मोपेड आणि तिनचाकी वाहने आटो रिक्शा, ट्रक्टर, जनावर वाहून नेणारी वाहने तसेच कमी गतीने चालणाऱ्या वाहनांवर सागरी सेतूवर पुर्णता बंदी घालण्यात आली आहे.

अटल सेतूबद्दल

-बाधकामात ५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.

- सेतूची लांबी २२ किमी, त्यातील १६.५० किमी भाग समुद्रात तर ५.५० किमी भाग जमिनीवर.

- सागरी सेतूसाठी १८ हजार कोटींचा खर्च

- मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन बंदरांना जोडले

- मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.

- बांधकामासाठी सात वर्षांचा कालावधी लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT