Atal Setu 
मुंबई

Atal Setu: आशियातला सर्वात लांब, जगातलं पहिलं तंत्रज्ञान अन्...; असा आहे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारा मुंबईतला 'अटल सेतू'

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची सविस्तर माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अटल सेतू-मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या पुलाचं उद्घाटन उद्या (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. पण या पुलाची वैशिष्ट्ये ऐकून तुम्ही चक्रावून जाल. कारण आशियातील सर्वांत लांब, जगातील पहिलं तंत्रज्ञान यांसह अनेक आश्चर्यकारक बाबी या पुलाबाबत आहेत. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी याची माहिती दिली. (atal setu asia longest world first technology and many amazing things tommorow inaugurated by pm modi)

उद्या मोदींच्या हस्ते उद्धाटन

संजय मुखर्जींनी सांगितलं, "अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा पूल (अटल सेतू) याचं उद्घाटनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १२ जानेवारीला होणार आहे. या प्रकल्पाला अनेक जण इंजिनिअरिंगचा मार्वल असं म्हणताहेत. याच्या मागं तशी कारणंही आहेत. कारण हा पूल भारतातील सर्वात लांब पूल असून भारत आणि आशियातील सर्वात मोठा समुद्रातील पूल आहे. हा पूल जगातील समुद्रातील सर्वात टॉप पूलांपैकी मानला जातो. या पुलासाठी तीन विभागात काम करण्यात आलं आहे. यामध्ये जमिनीवरचा पूल, समुद्रात एक पूल आहे तसेच खडकावरही पुलाचं काम करण्यात आलं आहे.

राडोरोडा उचलणार अत्याधुनिक तंत्रज्ञान

यामध्ये अनेक तंत्रज्ञान असे वापरण्यात आले आहेत. यांपैकी भारतात पहिल्यांदाच वापरलं जात आहे. ज्यामध्ये ऑर्थोटॉपिक्स स्टिल डेक्स यामध्ये आवाज कमी होतो तसेच व्हायब्रेशन्स कमी होतात. यामुळं पाण्यातील जीवांवर कमीत कमी धोका निर्माण होत नाही. अनेक अशी उपकरणं वापरण्यात आली आहेत. ज्यामध्ये काम सुरु असताना आवाज कमी होतो तसेच राडारोडा उचलण्याचं खास तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. (Marathi Tajya Batmya)

आयफेल टॉवरपेक्षा जास्त स्टील

या पुलामध्ये वापरलेलं स्टील हे आयफेल टॉवरपेक्षा १७ पट जास्त आह. तसेच स्ट्रक्चरल स्टील जे वापरण्यात आलं आहे ते हावडा ब्रीजपेक्षा चार पट अधिक आहे. यामध्ये जे काँक्रिट वापरण्यात आलं आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट अधिक आहे. यामध्ये जे वायरिंग आहे ती देखील मोठी आहे. तसेच याच्या बांधकामासाठी जे ट्रक्स वापरलेत त्याबाबत असं सांगितलं जातं की, हे ट्रक्स जर सरळ रेषेत उभे केले तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत रांग लागेल. या प्रकारच्या अनेक वैशिष्ट्ये आत आहेत.

मुंबई, नवी मुंबई, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडणार

त्याचबरोबर यामध्ये आणखी काही खासियत आहेत. जसं की पर्यावरण संरक्षण आहे. यामध्ये नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं ही पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थेनं या पुलाच्या बांधकामासाठी अॅप्रिसिएशनचं प्रमाणपत्र दिलं आहे. या पुलावर ज्या लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत त्या पण्यातील जलचरांच्या वातावरणाला धक्का लागू देत नाहीत. (Latest Marathi News)

या अनेक तांत्रिक वैशिष्ट्ये यात आहेत. मुंबई शहराला नवी मुंबईशी जोडतो हा एक ऐतिहासिक पूल बनला आहे. पुढे या पुलाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला जोडण्याची योजना केली जात आहे. नंतर जेव्हा मल्टिमोडल कॉरिडॉर बनेल तेव्हा त्याला देखील हा पूल जोडला जाईल. हा पूल जेव्हा सुरु होईल तेव्हा मुंबईतल्या ट्राफिकचा मोठा प्रश्न सुटेल.

या पुलावरुन कुठल्या गाड्या धावणार?

या पुलावरुन चारचाकीपासूनवरील सर्व प्रकारची वाहनं यावरुन धावतील. दुचाकी, ऑटो रिक्षा, सायकल आणि हातगाड्या यावरुन जाऊ शकणार नाहीत. कारण सुरक्षेचा एक विषय आहे. दुसरा म्हणजे एका विशिष्ट स्पीडनं गाडी चालवावी लागते त्यामुळं ट्राफिक सुरळीत सुरु राहतं. तसेच टोलबाबतही सरकारनं याबाबत नोटिफिकेशन काढलं आहे. यामध्ये टोल घ्यावा लागणार आहे कारण जपान सरकारच्या जायका या आर्थिक संस्थेकडून कर्ज घेऊन उभारण्यात आला आहे. त्यामुळं या कर्जाची पण परतफेड करावी लागणार आहे.

टोलची योजना कशी असेल?

यामध्ये दोन प्रकारे टोलनाके असतील. पण सुरुवातीला सरकारनं इथं ओपन टोलिंगची सुविधा ठेवली आहे. ओपन टोलिंगमध्ये कोणालाही थांबावं लागणार नाही. यामध्ये पावरफुल अशा आरएफआयटी स्कॅनरमार्फत तुमच्या गाडीवर लावलेल्या स्टिकरला तो स्कॅन करुन टोल तुमच्या अकाऊंटमधून वसूल करेल. सुरुवातीला एक महिनाभर या ओपन टोलिंगचा प्रयोग केला जाणार आहे. यानंतर यामध्ये काय अडथळे आणि अडचणी येत असतील तर त्यावर नंतर विचार केले जातील.

अत्याधुनिक ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम

यामध्ये जे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम बसवण्यात आलं आहे ते भारतातील सर्वात अत्याधुनिक आहे. यामध्ये १९० तर थर्मल कॅमेरे आहेत. कारण यामध्ये धुकं आलं व्हिसिबिलिटी कमी झाली तरी हे कॅमेरे ते टिपू शकतील. गाडी थांबली, खराब झाली किंवा गाडीतून कोणी उतरलं तरी देखील हे कॅमेरे ते टिपू शकतात. निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगानं जर कोणी गाडी चालवत असेल तर ते देखील या कॅमेरॅत टिपलं जाईल. कालच वेग मार्यादेचं देखील नोटिफिकेशन सरकारनं काढलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT