Atal Setu Mumbai Traffic sakal
मुंबई

Atal Setu Mumbai Traffic: अटल सेतूमुळे मुंबईकरांना होणार मनस्ताप? महत्वाच्या त्रुटी आल्या समोर!

Atal Setu Mumbai Traffic: त्यामुळे बीपीटीमध्ये पार्किंगसाठी येणाऱ्या गाड्यांना रे रोड वरू ये जा करण्याची व्यवस्था करावी व कॉटन ग्रीन येथे केवळ सागरी सेतूवर जाणाऱ्या वाहनांना जागा करून दिल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, असेही एमएमआरडीएला दिलेल्या पत्रात पडळळ यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवडी-न्हावा शेवा सागरीसेतू महामार्गाचे लोकार्पण उद्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या मार्गामुळे शिवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवडी नाव्हाशेवा सागरी सेतूनचे मार्गाचे लोकापर्ण झाल्यानंतर या मार्गावरून ये जा करण्यास सुरूवात होईल. मात्र वाहनांना योग्य दिशेने मार्गस्थ होण्यासाठी दिशादर्शक फलक अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय झाली आहे.

त्यामुळे तातडीने दिशादर्शक फलक लावण्यात यावेत अशी मागणी शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.

त्यांनी पालिकेच्या पूल विभागाला तसे पत्र दिले आहे. दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहने चुकीच्या मार्गाने जातील व त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. याबाबत एमएमआरडीने देखील पालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्याची सोमवारी संध्याकाळपर्यंत अंमलबजावणी झाली नव्हती. फलक तातडीने लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऑरेंज गेट येथून पूर्व मुक्त मार्गावर आल्यानंतर थेट वाशी आणि मानखुर्दकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावलेले आहेत. मात्र आता यात बदल करावा लागणार आहे. मात्र शिवडी नाव्हा शेवा सागरीसेतूकडे जाण्यासाठी या मार्गावरून कॉटन ग्रीनला खाली उतरावे लागणार आहे. नंतर गाडीअड्डावरून सागरी सेतूकडे जावे लागणार आहे.

परंतु, त्याकरीता तसे दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनचालक थेट वाशी, मानखुर्दपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा मागेही येता येणार नाही. त्यामुळे तातडीने हे दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.

कॉटनग्रीन फायरस्टेशन शेजारीच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वाहतनतळाच्या जागा आहेत. या ठिकाणी आधीच दररोज हजारो वाहने पार्किंगसाठी येत असतात. दोन्ही ठिकाणाहून वाहनांचा प्रवाह वाढल्यामुळे झकेरिया बंदर रोज, नाथ पै मार्ग, दत्ताराम लाड मार्ग या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते.

त्यामुळे बीपीटीमध्ये पार्किंगसाठी येणाऱ्या गाड्यांना रे रोड वरू ये जा करण्याची व्यवस्था करावी व कॉटन ग्रीन येथे केवळ सागरी सेतूवर जाणाऱ्या वाहनांना जागा करून दिल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, असेही एमएमआरडीएला दिलेल्या पत्रात पडळळ यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT