Swapnil Jain and Devendra Fadnavis sakal
मुंबई

Ather Energy : छत्रपती संभाजीनगरात ‘एथर’चा महाप्रकल्प; चार हजार रोजगारांची होणार निर्मिती

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधील आघाडीचा उद्योगसमूह ‘एथर एनर्जी’ छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिकसिटीत वाहन निर्मितीचा मोठा प्रकल्प उभारणार आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधील आघाडीचा उद्योगसमूह ‘एथर एनर्जी’ छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिकसिटीत वाहन निर्मितीचा मोठा प्रकल्प उभारणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही घोषणा केली. तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून या प्रकल्पात ४ हजार एवढ्या रोजगाराची निर्मिती होईल असे त्यांनी म्हटले आहे.

या उद्योगसमूहाचे संस्थापक स्वप्नील जैन यांनी फडणवीस यांची भेट घेत यासंदर्भात गेले आठ महिने सुरू असलेल्या चर्चांना मूर्तरूप दिले. ‘महाराष्ट्राने परकी गुंतवणूक खेचण्यात आघाडी घेतली आहे. दरवर्षी १० लाख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माण करणारा हा कारखाना या भागाचे उद्योगचित्र बदलणारा ठरेल,’’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

तमिळनाडूत ‘ओला’ने इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणारा कारखाना काढला आहे. त्यानंतरचा हा या क्षेत्रातील दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या संदर्भात आनंद व्यक्त करताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मोठ्या प्रमाणात उद्योग येतील असे सांगितले.

महत्त्वाकांक्षी विकासक्षेत्र

‘ऑरिक’ हे पूर्वीपासून महत्त्वाकांक्षी विकासक्षेत्र विकसित केले जाते आहे. इलेक्ट्रिक वाहने हा नव्या जगात झपाट्याने वाढणारा उद्योग असून अथर तेथे बॅटरीचे उत्पादनही सुरू करणार असल्याचे समजते. या प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या एका अधिकाऱ्याने चारचाकी ‘ईव्ही’मध्ये (इलेक्ट्रिक व्हेईकल) प्रचंड गुंतवणूक होते आहे पण दुचाकीचे क्षेत्र अद्याप त्यापासून दूर होते, आता या प्रकल्पानंतर हे चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त केला.

फडणवीस यांच्याकडून पाठपुरावा

ओकीनावा, हिरो, अॅम्पियर, रिओ आणि झिलॉन या कंपन्यांनी याआधीच ईव्हीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. ‘एथर’चा ४५० हा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे. दरम्यान औरंगाबाद परिसरातच याच गाडीचे उत्पादन होईल का? ते समजू शकलेले नाही. ‘एथर’ने आपल्या राज्यात यावे यासाठी कर्नाटक, गुजरात ही राज्येही प्रयत्न करत होती. उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच उद्योग खात्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प ऑरिकसिटित आल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT