ATS Action Mumbai terrorist attack informant arrested from Ahmednagar crime esakal
मुंबई

Crime News : मुंबईत दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देणारा अहमदनगरमधून अटकेत

वैयक्तिक वादामुळे त्याला अडकविण्यासाठी हा बनाव रचल्याचे तपासात समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत तीन दहशदवादी धुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या व्यक्तीस बेड्या ठोकण्यात आल्या. यासिन सय्यद असे आरोपीचे नाव आहे. यासिन सय्यद याचा एका व्यक्तीशी असलेल्या वैयक्तिक वादामुळे त्याला अडकविण्यासाठी हा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.

घटनाक्रम

7 एप्रिल शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन आला ज्यात दावा केला गेला की पाकिस्तानशी संबंध असलेले तीन दहशतवादी दुबईहून पहाटे मुंबईत आले आहेत. कॉलरने तीन दहशतवाद्यांपैकी एक मुजीब मुस्तफा सय्यद अशी ओळख फोनवर पोलिसाना सांगितली.

तसेच कथित दहशतवादी वापरत असलेल्या चारचाकीरचा नंबर देखील उघड केला. दहशतवादी सय्यद अनेक अवैध कारवायामध्ये गुंतला असल्याची माहिती फोन करणाऱ्याने पोलिसांना दिली आणि फोन कट केला. परत पोलिसांनी या क्रमांकावर फोन केला असता तो फोन क्रमांक बंद असून उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

पोलिसांचा तातडीचा शोध

या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र एटीएसनेही तपास केला. पण तपासाअंती वैयक्तिक वैमनस्यातून ही खोटी माहिती देण्यात आली असल्याचे समोर आले. आरोपीने 2013 साली हे सिमकार्ड विकत घेतले होते. वैयक्तिक मालमत्तेच्या वादातून बदला घेण्यासाठी मुंबई पोलिसांना फोन करण्यासाठी त्याने या सिमकार्डचा वापर केल्याचे समोर आले.

त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला अहमदनगरमधील अटक करुन आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सतत फेक कॉल येत असल्याची वृत्त येत आहेत. तपासाअंती फोन करणाऱ्या व्यक्ती मनोरुग्ण किंवा बदला घेण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचे समोर येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT