central railway carrier sakal media
मुंबई

रेल्वेकडून ऑटोमोबाईल उत्पादनांची ५.३३ दशलक्ष टन विक्रमी मालवाहतूक !

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेने (central railway) क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (BDU) स्थापित केले आहे. याद्वारे मध्य रेल्वेने जुलै 2021 ऑटोमोबाईल उत्पादनांची (Automobile production) विक्रमी वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने 5.33 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. मागील वर्षी जुलैमध्ये 4.25 दशलक्ष टन होती. जुलै 2021 मधील मालवाहतूक (goods carrier) लोडिंगमध्ये जुलै 2020 च्या तुलनेत 25.41 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. बीडीयूच्या पुढाकाराने जुलै 2021 च्या महिन्यात (july month) ऑटोमोबाईलचे जवळजवळ 51 एनएमजी रेक लोड झाले. ज्यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील (bhusaval) नाशिक रोड येथून 29 एनएमजी रेक, पुणे विभागातील चिंचवडमधून 20 एनएचएमजी रेक आणि मुंबई (Mumbai) विभागातील कळंबोली येथून 2 एनएमजी रेक लोड झाले. (automobile production-goods carrier-july month-mumbai-central railway-nss91)

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जुलै 2021 मध्ये 1.37 दशलक्ष टन मालवाहतूक नोंदविली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 1.23 दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत 11.30 टक्क्यांची वाढ दिसून झाली आहे. लोह, स्टील, खते आणि कंटेनरची झालेल्या उत्तम लोडिंगमुळे ही वाढ झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जुलै 2021 महिन्यात 2.87 दशलक्ष टन मालवाहतूक केली. मागील वर्षीच्या 2.10 दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांपेक्षा अधिक 36.67 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.

या विभागांतून कोळसा, सिमेंट या पारंपारिक मालवाहतूक लोडिंगसह कापसाच्या गाठी, साखर आणि फ्लाय ॲश या नवीन मालाला आकर्षित केले. जुलै 2021 मध्ये सोलापूर विभागाने 0.54 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. मागील वर्षीच्या 0.42 दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत 27.59 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ सिमेंट आणि साखर यासारख्या मुख्य मालाच्या चांगल्या लोडिंगमुळे झाली. भुसावळ विभागाने 0.44 दशलक्ष टन मालवाहतूक केली. जी मागील वर्षीच्या 0.41 दशलक्ष टनांच्या तुलनेत 7.31 टक्के वाढ दर्शवते. या विभागातील नाशिक येथून 29 एनएमजी रेक लोड केले आहेत. जे आतापर्यंत नाशिकहून सर्वाधिक आहेत. पुणे विभागाने 0.11 दशलक्ष टन मालवाहतूक केली.

मागील वर्षीच्या 0.09 दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत 22.2 टक्के वाढ दर्शवते. बीडीयूच्या पुढाकाराने जुलै 2021 मध्ये ऑटोमोबाईल लोडिंगचे 20 एनएमजी रेक मालवाहतूकीसाठी मिळाले. लवचिक योजना, कमी दर, वेगवान वाहतूक, संरक्षित व सुरक्षित वाहतूक आणि पर्यावरणास अनुकूल असल्याने व्यापार आणि उद्योगजगतील उद्योग त्यांची सामग्री आणि वस्तूंची रेल्वेने वाहतूक करण्यास इच्छुक आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वेच्या झोनल आणि विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) ने घेतलेले पुढाकार या अधिक मालवाहतुकीसाठी साहाय्य ठरले आहे. बीडीयू विविध मालवाहक, नवीन ग्राहक, व्यापार संस्था आणि लॉजिस्टिक कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना

यांचा विचार करून अभ्यास करते.

या उपक्रमांमुळे रेल्वेकडे अनेक नवीन मालवाहतूक आकर्षित झाले असून व्यापार आणि उद्योगाशी संबंध वाढला. बीडीयू हे स्थानिक शेतकरी, लोडर, लॉजिस्टिक कंपन्या आणि वैयक्तिक नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे आक्रमकपणे मार्केटिंग करतात आणि त्यांच्या मागण्या एकत्रित करतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT