अयोध्या श्रीराम मंदिराचे काम अत्यंत वेगात सुरू आहे. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम लल्ला यांची स्थापना निश्चितपणे पूर्ण करणार आहोत.
डोंबिवली - अयोध्या श्रीराम मंदिराचे काम अत्यंत वेगात सुरू आहे. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम लल्ला यांची स्थापना निश्चितपणे पूर्ण करणार आहोत असा विश्वास अयोध्येचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी डोंबिवली येथे व्यक्त केला.
डोंबिवली मधील एम्स हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे उद्धाटन स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, डॉ. मिलिंद शिरोडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी मनमोकळी उत्तर दिली. जानेवारी 2024 मध्ये अयोध्या येथील श्री राम मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिराचे काम त्यानंतरही पुढे चालू राहील. पण मुख्य गाभारा, पहिला मजला आणि दर्शनाची व्यवस्था इतके काम होऊन जाईल. आणि श्रीराम लल्लाचे नवीन भव्य दिव्य मंदिरात आगमन होईल.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण होईल का याविषयी स्वामी गोविंददेवगिरी म्हणाले, लोकसभा निवडणुकांशी आमचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या गतीने काम पूर्ण करत आहोत. आमचे टार्गेट आहे की जानेवारीच्या तिसरा आठवड्यात हे काम पूर्ण करावं आणि भगवान राम लल्लांना त्यांच्या मुळस्थानी आणून विराजमान करावे. हे काम जितक्या लवकर होईल तेवढे आम्हाला हवे आहे. कारण भगवान राम लल्ला यांनी पुष्कळ दिवस कपड्याच्या मंडपात काढले आहेत. आता एका छोट्या तात्पुरत्या मंदिरात ते विराजमान आहेत. त्यामुळे आमची तळमळ ही आहे की त्यांनी लवकरात लवकर आपल्या मूळ स्थानी विराजमान व्हावे.
डोंबिवली मधील विविध कार्यक्रमात स्वामी गोविंद देवगिरी हे सहभागी होणार आहेत. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात देखील ते सहभागी होणार आहेत. याविषयी स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, अयोध्या राम मंदिराच्या कामामुळे मला सध्या वेळ फार कमी मिळतो. आणि म्हणून या तीनही कार्यक्रमांना एकत्र करून आज डोंबिवलीकरांनी मला त्यांच्या सेवेची संधी दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
कल्याण ग्रामीण मधील श्री मलंगगड येथे नवनाथ महाराज यांची समाधी असून मलंगगड मुक्तीसाठी हिंदू समाज एकवटला आहे व लढा देत आहे. हिंदुत्वाचे सरकार असून मलंगगड मुक्तीविषयी मत व्यक्त करताना ते म्हणाले, अशा प्रकारची जी काही स्थाने आहेत त्यांचा पुनरुद्धार व्हावा असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.