Baba Siddique Murder Dharmaraj Kashyap is not a minor police custody till 21 September  sakal
मुंबई

Baba Siddique Murder: धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; डाव फसला, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी धर्मराज काश्यप ऊर्फ रंजन कुमार गुप्ता याने दंडाधिकारी न्यायालयात अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र त्याचा हा दावा खोटा ठरला असून तो अल्पवयीन नसल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या धर्मराज काश्यपचा डाव फसला आहे. चाचणीमध्ये तो अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर काश्यपने आपण सतरा वर्षाचे असल्याचा दावा केला होता. या दाव्या नंतर काश्यपची चाचणी करण्यात आली.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या धर्मराज कश्यपचा डाव फसला आहे.ऑस्सफकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झाल आहे. रविवारी कोर्टात हजर केलं असता कश्यपने तो १७ वर्षीय आल्याचा दावा केला होता. मात्र दाव्यानंतर कश्यपची ऑस्सफिकेशन चाचणी करण्याचे होते कोर्टाचे निर्देश दिले होते.

ऑस्सफिकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याच निष्पन्न झाले आहे. यानंतर रात्री कश्यपला कोर्टात हजर करण्यात आले. कश्यपला देखील 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना चौकशी करतांना शस्त्रसाठा, दोन मोबाईलसह या आरोपीकडे दोन आधार कार्ड सापडली आहेत. दोन्ही कार्डांवरील छायाचित्रे आरोपीचीच आहेत. एकावर धर्मराज कश्यप, तर दुसऱ्यावर रंजनकुमार गुप्ता असे नाव आहे. दोन्ही कार्डांवरील जन्मतारखेनुसार या आरोपीचे वय १८ आणि २३ असे दिसत आहे. मात्र, दोन्ही कार्ड बनावट असण्याच्या शक्यतेने न्यायालयाने या चाचणीद्वारे आरोपीचे वय स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. अखेर ऑस्सफिकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याच निष्पन्न झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Toll Waiver: मुंबईकर 'टोल'मुक्त! शहरातील पाचही टोल नाक्यांवर 'या' वाहनांना आता भरावा लागणार नाही शुल्क

Mukesh Ambani: मुकेश अंबानी बॉलीवूडवरही करणार राज्य; करण जोहरची कंपनी घेणार विकत

खूब लड़ी मर्दानी! Harmanpreet Kaur ची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार फिफ्टी

Diwali 2024 Fashion Tips: तुम्हालाही सणासुदीत परफेक्ट लूक हवायं? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये 'या' 4 प्रकारच्या साड्या असल्यास पाहिजेत

Bhavish Aggarwal: ओलाला आणखी एक झटका! ग्राहकांकडून घेतलेले पैसे बँक खात्यात परत करावे लागणार, CCPAने दिले आदेश

SCROLL FOR NEXT