Baba Siddique Murder pune connection  sakalk
मुंबई

Baba Siddique Murder: सिद्दीकी हत्या कटाचं काय आहे पुणे कनेक्शन, जाणून घ्या आतली बातमी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा

Mumbai: माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी तथा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटावर पुण्यात शिक्कामोर्तब झाले. पुण्यातील बैठकीत मारेकऱ्यांना सिद्दीकी यांची छायाचित्रे आणि अर्थसहाय्य पुरविण्यात आले, अशी माहिती गुन्हे शाखेने आतापर्यंत केलेल्या चौकशीतून पुढे आली आहे.

पोलिसांनी रविवारी पुण्यातून अटक केलेला प्रवीण लोणकर, त्याचा सख्खा भाऊ शुभम यांनी सिद्दीकी यांच्या हत्येसाठी शिवकुमार गौतम आणि धर्मराज काश्यप ऊर्फ रंजनकुमार गुप्ता या उत्तर प्रदेशातील तरुणांना कटात सहभागी करून घेतले. साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत लोणकर बंधूंनी या दोघांना सिद्दीकी यांची छायाचित्रे दिली आणि हत्या करण्यास सांगितले.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लोणकर बंधूंनी सिद्दीकी यांचे वांद्रे पूर्व परिसरात लागलेल्या फ्लेक्सचीही छायाचित्रे मारेकऱ्यांना दिली. सोबत रोख रक्कम मारेकऱ्यांच्या हाती ठेवली. या बैठकीस अन्य फरारी आरोपी जिशान अख्तरही उपस्थित होता. या बैठकीनंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धर्मराज आणि गौतम मुंबईत आले.

गौतमला कुर्ला परिसरातच भाड्याने घर शोधण्याच्या स्पष्ट सूचना लोणकर बंधूंनी दिल्या होत्या. त्यानुसार त्याने स्वतः एक खोली पाहिली आणि भाड्याने घेतली. त्यानंतर काही दिवसांनी अन्य मारेकरी गुरमेल बलजितसिंग कुर्ला येथे आला. मुंबईतील वास्तव्यात मारेकऱ्यांनी जिशानच्या मदतीने सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवली होती. लोणकर बंधू आणि मारेकरी यांच्यात जिशान मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत होता.

दरम्यान, प्रमुख आरोपी प्रवीण याचे पुण्यात दुग्धालय आहे. तेथे प्रवीणसोबत भाऊ शुभमही अधूनमधून उपस्थित असे. या दुग्धालयाच्या शेजारील भंगार विक्रेत्याकडे गौतम काम करत होता. त्याने धर्मराज यालाही तेथे बोलावून घेतले होते. आसपास व्यवसाय असल्याने मारेकरी आणि लोणकर बंधूंमध्ये परिचय होता, तसेच मारेकरी पुण्याहून मुंबईला आले तेव्हापासून प्रवीण त्यांच्या सतत संपर्कात होता, अशी माहिती तपासातून पुढे आल्याचे समजते.

लोणकर बंधूंचा हॅण्डलर कोण?

पुण्यातील लोणकर बंधूंनी कोणाच्या इशाऱ्यावर सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पूर्णत्वास नेला, हे गुन्हे शाखेकडून शोधले जात आहे. त्यासाठी अटकेत असलेल्या प्रवीणकडे कसून चौकशी सुरू असून त्याचा फरारी भाऊ शुभम याचा कसोशीने शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. शुभम पुण्यातूनही महिनाभरापूर्वीच पसार झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhukar Pichad: माजी मंत्री मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोक; नाशिकमध्ये उपचार सुरू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, सरकारचं पत्र मिळालं का? आचारसंहितेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द; योजनांची होणार आखणी

धोंडू, अरे एवढी काय घाई होती.... अतुल परचुरेंच्या निधनाचा संजय मिश्रा यांना धक्का, तो व्हिडिओ शेअर करत म्हणाले-

Petrol Pump Strike : ...अन्‍यथा ३१ ऑक्‍टोबरला पेट्रोलपंप बंद! पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी चर्चा हवामान, खेळपट्टी आणि गोलंदाजांची!

SCROLL FOR NEXT