Baba Siddique Esakal
मुंबई

Baba Siddique Murder Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी अपडेट! चौथ्या आरोपीला अटक, पुण्याशी आहे कनेक्शन

अटक झालेल्या चौथ्या आरोपीचं पुण्याशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी चौथी अटक झाली असून त्याचं पुण्याशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळं या कटात पुण्याचा सहभाग असल्यानं खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही अटक केली असून हरीश कुमार बालकरामा असं या २३ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. हरीश कुमार हा पुण्यातील एक स्क्रॅप डीलर असून त्यानं सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात पैसा तसंच इतर सहकार्य पुरवल्याचा त्यासाठी लॉजिस्टिकल सपोर्ट केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून काही वेळातच त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता चौथा आरोपीही अटकेत आहे. या गोळीबार आणि हत्या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

High Court : ... तर तरुणाईचे आयुष्य होणार उद्ध्वस्त, उच्च न्यायालय : तस्करीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT