Baba Siddique shares a heartfelt message in his latest social media post, reflecting on friendship and community. Esakal
मुंबई

Baba Siddique Last Social Media Post: बाबा सिद्दीकी सोशल मीडियावर शेवटचे काय म्हणाले होते? काय होती शेवटची पोस्ट?

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात शनिवारी रात्री गोळीबाराचे प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे परिसरात गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही वेळाने लीलावती रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. बाबा सिद्दीकी यांच्या मुलाच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन गुन्हेगारांना अटक केली आहे, तर आणखी एका गुन्हेगाराचा शोध सुरू आहे.

बाबा सिद्दीकींची शेवटची पोस्ट

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या शेवटच्या पोस्टवर युजर्स कमेंट्स करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मुंबईतील बडे नेते आणि बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाबा सिद्दीकींनी काल दसऱ्याच्या सणानिमित्त एक्सवर एका ओळीची पोस्ट लिहिली होती. यामधून त्यांनी विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

शेवटची फेसबुक पोस्ट

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी फेसबुकवर टाटा यांना श्रद्धांजली वाहीली होती. दरम्यान रतन टाटा यांना वाहीलेली श्रद्धांजली सिद्दीकी यांनी फेसबुकवरील पोस्ट शेवटची ठरली.

बाबा सिद्दीकी यांच्या या पोस्टखाली कमेंट करताना एक युजर म्हणाला, "काल बाबा सिद्दीकी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली पण आज रात्री तेच नाहीत. "हाच या जीवनाचा खरा रंग आहे."

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या पथकाने यापूर्वी मुंबईतील अनेक मोठ्या कारवायांमध्ये मुंबई पोलिसांसोबत काम केले आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या दोन शूटर्सपैकी एक हरियाणाचा तर दुसरा आरोपी यूपीचा आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या पथकाने गोळीबार केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली.

मुंबई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी वापरलेले 9.9 एमएमचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

या हत्येमागे काही बड्या गुंडाचा हात असण्याची शक्यता पोलिसांना आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या टीमने यूपी एसटीएफ आणि हरियाणा सीआयएशीही संपर्क साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवाब मलिक यांच्या जावयाच्या निधनाचे वृत्त अफवा! महत्त्वाची अपडेट समोर...

Bishnoi Gang-Baba Siddique: "सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो..." बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी अखेर बिश्नोई टोळीने स्वीकारली

"सिनेमाची स्वतःचं तिकीट खरेदी करून खोटं कलेक्शन जाहीर केलं" , दिव्या खोसलाने केला आलियावर आरोप

Assembly Election 2024: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उलथापालथ! काँग्रेमधून महिला आमदाराची हकालपट्टी, अजित पवार गटात करणार प्रवेश!

State Funeral For Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT