Zeeshan Siddiqui ESakal
मुंबई

Zeeshan Siddiqui Post: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया समोर, भावनिक पोस्ट लिहित म्हणाले...

Vrushal Karmarkar

बाबा सिद्दीकींची झीशान यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती. झीशान सिद्दीकी यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. बुधवारी त्यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांचीही भेट घेतली होती. यानंतर आज पहिल्यांदाच झीशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकींची हत्येच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

वडील बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी राजकारण करू नये, असे आवाहन काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी केले आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला या प्रकरणी न्याय हवा आहे, असे झीशान सिद्दीकी यांनी सांगितले. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

झीशान सिद्दीकी यांनी 'X' वर लिहिले की, "माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोक आणि त्यांची घरे वाचवण्यासाठी आपला जीव दिला आहे. आज माझे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, परंतु मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये आणि ते विसरता कामा नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विट करत दिली आहे.

बाबा सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. काँग्रेसमध्ये असताना ते महाराष्ट्राचे मंत्रीही होते. याच वर्षी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई यांनी घेतली आहे. ज्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करून जबाबदारी घेतली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे, ज्याने गोळीबार करणाऱ्यांना बंदूक पुरवली होती.

पुण्यात तीन महिन्यांपूर्वी खुनाचा कट रचला गेल्याचे आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना आढळून आले आहे. शूटर्स महिनाभर बाबा सिद्दिकींची रेकी करत होते. हे शूटर अनेकवेळा बाबा सिद्दिकींच्या घराजवळही बंदूक न बाळगता गेले होते. अटक केलेल्या चार आरोपींपैकी एकाने मुंबईत भाड्याने घर घेतले होते आणि उर्वरित आरोपींना आपल्याकडे बोलावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT