मुंबई

मालाडचा कोंडवाडा असुविधांच्या फेऱ्यात, अपुऱ्या सोयींमुळे गुरांचे हाल

निसार अली

मुंबई:  मालाडच्या एव्हरशाईन नगर इथल्या पालिकेच्या कोंडवाड्यात अपुऱ्या सोयीमुळे गुरांची आबाळ होत असल्याचे चित्र आहे. या कोंडवाड्यात दिडशे गुरं ठेवण्याची क्षमता आहे. गुरांना सुका चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जाते. मात्र इतर आवश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे. कोंडवाड्यातील फुटलेल्या गटारात अनेक वेळी गुरं पडून जखमी होतात. अनेकदा गुरांचा मृत्यू होतो. या संदर्भात अनेक तक्रारी होऊनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान आजच तीन गायींचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या कोंडवाड्यात गायींच्या चाऱ्याची व्यवस्था केली जाते. तिथल्या गटाराचे पाणी या चाऱ्यात मिसळते. हे घाण पाणी प्यायल्यानं गुरं आजारी पडताहेत. काही दिवसांपूर्वी इथे आणलेली  एक गाय कोंडवाड्यातील गटारात पडून गंभीर जखमी झाली. पशु रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले नसल्यामुळे या गाईचा दुर्देवी मृत्यू झाला. या गायीचे पोस्टमार्टेम उघड्यावर केले गेले. दोन दिवस उलटून गेल्यानंतर या गायीचे तिथेच पडून होता. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली.

या कोंडवाड्यातील दुरावस्थेबाबत पालिका दरबारी अनेक तक्रारी करण्यात आल्यात. मात्र पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या हलगर्जीपणाविरोधात  आंदोलनाचा छेडण्याचा इशारा प्राणी मित्र संघटनांनी दिला आहे.

 लक्षावधी रुपये खर्च करुनही पालिकेच्या कोंडवाड्यात गुरांची ही परिस्थिती होत असेल तर मग हे काम कोणत्या तरी संस्थेला द्यावे. पालिका अधिकारी आणि कर्मचारी इथल्या परिस्थितीबद्दल सातत्याने दुर्लक्ष करताहेत. सरकारने दोषींवर कठोर कार्रवाई करावी. अन्यथा आम्ही आंदोलन उभारणार आहोत.
विघ्नेश मंजेश्वर,संचालक, व्हाय वी केअर 

ही खूप गंभीर बाब आहे. गायीचे शव उघड्यावर पडल्यामुळे असह्य दुर्गंधी पसरली. मात्र पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही पडलेली नाही.
संतोष चिकणे, स्थानिक रहिवासी

हा कोडवाड़ा खुप जूना आहे. तसेच या कोंडवाडयाची दुरुस्ती सुरु आहे. या प्रकाराबद्दल माहिती घेऊन आम्ही चौकशी करु.
डॉ. मनोज माने, सहायक व्यवस्थापक देवनार पशु

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

The Bad condition of animals Malad Kondwada Three cows died

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: फेडच्या व्याजदर कपातीचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Mohammad Nabi: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी घेणार निवृत्ती, 'ही' टूर्नामेंट असेल शेवटची

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोलाची कामगिरी; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

SCROLL FOR NEXT