मुंबई

बदलापूरकरांना बाप्पा पावला; कोव्हिड रुग्णालयाचे पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन

आहुती त्रिवेदी

बदलापूर: गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला शुक्रवारी (ता.21) सायंकाळी गौरी हॉलमध्ये पालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णालयाचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालिकेला आणखी पाच कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली. कोव्हिडच्या औषधांचा काळाबाजार केलेला खपवून घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट इशाराही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष एड. प्रियेश जाधव, माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते श्रीधर पाटील, बदलापूरचे प्रशासक जगतसिंग गिरासे, मुख्याधिकारी दीपक पुजारी, पालिकेचे वैधकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, अभियंता जयेश भैरव, सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर मान्यवर उपस्थित होते.

पालिकेच्या या रुग्णालयात आयसीयू बेड, बेड सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठीची व्यवस्था तसेच ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तपासण्या वाढवल्यानंतर रुग्णांची संख्या वाढणार असल्याने व शहरातील रुग्णांना शहरातच तातडीने उपचार मिळावेत. यासाठी पालिकेने कोव्हिड रुग्णालय उभारले आहे. या पुढील काळात जशी गरज पडेल तसे या हॉस्पिटलमध्येच बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. नगरपरिषदेने शहरातील इतर अनेक खासगी रुग्णालय आणि हॉल आरक्षित करून ठेवले आहेत. गरज पडल्यास त्या ठिकाणी ही अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना चाचणी केंद्राचेही लोकार्पण बदलापूर पश्‍चिम भागात रंजन सोसायटी येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी केंद्राचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या चाचणी केंद्रामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची चाचणी एका दिवसात करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आता मुंबई व इतर ठिकाणच्या सरकारी व खाजगी चाचणी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. तसेच तातडीने पुढील उपचार घेणे शक्‍य होईल, असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.

 कोणत्याही प्रकारच्या औषधांचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. कोविडच्या या संकटात सर्वानीच एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व औषध कशी उपलब्ध करता येतील, यासाठी प्रयत्न केला जाईल. काळाबाजार करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले जातील. -

एकनाथ शिंदे,
पालकमंत्री.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे; संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या आमदाराची खोचक टीका

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result : 'ईव्हीएम'विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - डॉ. हुलगेश चलवादी

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT