300 Protesters Charged After Demonstrations Over the Incident  esakal
मुंबई

Badalapur school crime: चिमुरडीवर अत्याचार, पोलिसांचा निष्काळजीपणा! पण न्यायासाठी लढणाऱ्या 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात चपळाई

Badalapur school crime update : बदलापूरातील ही घटना पालकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या संस्था आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाची उदाहरणे उघड करते. या प्रकरणातून शाळा प्रशासन, पोलिस यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Sandip Kapde

बदलापुरातील एका शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये दोन निष्पाप 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या 23 वर्षीय क्लिनरला अटक केली आहे. शिंदे याला POCSO आणि BNS च्या इतर कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. शिंदे याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आंदोलकांचा संताप

ही घटना समजताच मोठ्या संख्येने पालक शाळेच्या बाहेर जमले आणि निषेध प्रदर्शन केले. संतप्त पालकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करून ११ तासांसाठी लोकल सेवा ठप्प केली होती. पोलिसांनी लाठीचार्जचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी दगडफेक केली आणि शाळेत तोडफोड केली. यामध्ये ३०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडला. मुली टॉयलेटचा वापर करत असताना आरोपीने त्यांचे लैंगिक शोषण केलं. शिंदे याला 1 ऑगस्ट रोजी शाळेत क्लिनर म्हणून ठेवलं गेलं होतं. मुलींच्या पालकांनी ही बाब लक्षात घेतल्यानंतर तात्काळ तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकारानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांची निष्काळजीपणा आणि विलंबित कारवाई

पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी सुरुवातीला तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोले यांनी POCSO प्रकरण असतानाही प्रक्रिया करण्यात विलंब केला. या प्रकारामुळे प्रकरण दाखल करण्यात 12 तासांचा उशीर झाला. आता पोलिसांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याचा तातडीने बदली नंतर निलंबित करण्यात आले.

शाळा प्रशासनाची लापरवाही

शाळेच्या प्रशासनाने या प्रकरणात गंभीर लापरवाही केली आहे. शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते. या प्रकरणात शाळेच्या प्रिन्सिपल, शिक्षक, नॅनी आणि कॉन्ट्रॅक्ट एजन्सीला निलंबित करण्यात आले आहे. शाळेच्या वतीने या संपूर्ण घटनेबद्दल माफी मागण्यात आली आहे.

बदलापूरातील ही घटना पालकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या संस्था आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाची उदाहरणे उघड करते. या प्रकरणातून शाळा प्रशासन, पोलिस यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT