Akshay Shinde Encounter sakal
मुंबई

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे याचे वकिल आणि कुटुंबियांची पोलिस संरक्षणाची मागणी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : बदलापूर चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे अक्षय याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आला आहे. यामुळे अक्षय याच्या कुटुंबियांनी गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.

अक्षय याच्या अंत्यसंस्काराकरीता जागा देण्यात यावी. तसेच आमच्या जिविताला धोका असल्याने सरकारने आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी कुटुंबाकडून केली आहे.बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलापूर येथे त्याचे अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबियांनी याप्रकरणी बदलापूर पोलिसांची देखील भेट घेतली आहे. याप्रकरणी दफन भूमीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर गुरुवारी शिंदे कुटुंब व अक्षय याचे वकील अमित कटारनवरे कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते.

यावेळी अक्षय याचे नातेवाईक अमर शिंदे यांनी सांगितले की, अक्षय शिंदे याचा खटला लढणारे वकिल आणि त्यांच्या आईवडिलांच्या जिविताला धोका आहे. अक्षय याच्यावर गुन्हा दाखल होताच बदलापूर मध्ये त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे कुटुंबाला पोलीस संरक्षण तसेच अक्षय याच्या अंत्यसंस्कारा करीता पोलिस बंदोबस्त द्यावा. ही मागणी राज्याचे गृहमंत्र्यासह पोलिस प्रशासन आणि न्यायालयाकडे केली आहे. अक्षय शिंदे यांच्या खटल्यातील दोषाराेप पत्राची पत्र मिळावी ही देखील मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अक्षय शिंदे याचे वकिल अमित कटारनवरे यांनी सांगितले की, न्याायलयात कालच विषय मांडला आहे. त्यांना दफनभूमीसाठी जागा मिळत नाही. सरकारच्या वतीने वकिलांनी स्पष्टीकरण दिले मात्र संध्याकाळपर्यंत तसे काही घडले नाही. त्यानंतर पोलिस उपायुक्तांशी बोलणे झाले. त्यांच्या सांगण्यानुसार न्यायालयात जे पत्र दिले आहे. त्यानुसार सकाळी पिडीताच्या नातेवाईकाना बोलविले. दोन तीन स्पॉट सांगितले आहेत. त्यानुसार त्याठिकाणी दफन केले जाणार आहे.

अक्षय शिंदे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सरंक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. सरकारने त्यांना समानतेच्या अधिकारावर संरक्षण दिले पहिजे. किरीट सोमय्याला जसे पटकन संरक्षण दिले जाते. त्याच पद्धतीने किरीट साेमय्याच्या तुलनेच अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना जास्त संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या जिवीतास जास्त धोका आहे. घटना घडल्यानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांना संरक्षण दयायला पाहिजे असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Latest Maharashtra News Updates: सीनेट निवडणूक दुसरा निकाल हाती, युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी

Crime: मुंबई हादरली! पत्नीवर अॅसिड हल्ला, पतीचं संतापजनक कृत्य, धक्कादायक कारण समोर

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....

Binny and Family : जुन्या आणि नवीन पिढीला विचार देणारा 'बिन्नी अ‍ॅण्ड फॅमिली' चित्रपट

SCROLL FOR NEXT