Badlapur News: कोणतीही गोष्ट करायची तर, नाही! कुठे जायचं तर, नाही! कोणाशी बोलायचं तर, नाही! आई वडिलांकडून येणाऱ्या या सततच्या नाही शब्दामुळे बदलापूर ग्रामीण पट्ट्यात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीने चक्क मृत्यूला कवटाळण्याचा प्रकार करत, उल्हास नदीत उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी नदीत सर्वत्र पसरलेली जलपर्णी त्यात अडकून पडलेल्या या तरुणीच्या प्रकाराबद्दल अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांना समजताच त्यांनी बचाव पथकात मदत करणाऱ्या जवळचे गावकरी असलेले मनोहर मेहेर यांची मदत घेऊन या तरुणीला वाचवले. सध्या एका खाजगी रुग्णालयात या तरुणीवर उपचार सुरु आहेत.
बदलापूर पासून सात ते आठ किमी अंतरावरील आंबेशीव या गावात राहणाऱ्या तरुणीने, घरी आपल्याला प्रत्येक गोष्टीत आई वडिलांकडून नकार आणि यातून सतत होणाऱ्या मानसिक तणावामुळे संजना हिने स्वतः च आयुष्य संपवण्याचा विचार केला. बुधवार दि.२७ रोजी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान एका तरुणीने उल्हास नदी वरील वालीवली येथील पुलावरुन नदीत उडी मारल्याची माहिती एका फोन द्वारे अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांना मिळाली.
लागलीच सोनोने यांनी आपल्या पथकासह, नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशन चे व सर्पमित्र मनोहर मेहेर आणि त्यांचे इतर गावकरी यांना मदतीसाठी बोलावले. यावेळी मेहेर यांनी लगेचच या तरुणीच्या बाचवसाठी अग्निशमन दलाला मदत करत, दोरीच्या साहाय्याने नदीत उतरुन त्या तरुणीला वर काढले साधारण हे रेस्क्यु ऑपरेशन व्हायला एक तासाचा वेळ लागला.
त्यानंतर लगेचच तरुणीला उपचारासाठी बदलापूर पश्चिम येथील सिद्धिविनायक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असून, थोड्या मानसिक तणावाखाली तरुणी असल्याचे डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले. या संपूर्ण घटने विषयी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याशी संपर्क केला असता.
त्यांनी मुलीची जबानी घेतल्यावर त्या मुलीने आपले आई वडील आपल्याला सतत ओरडत आणि प्रत्येक गोष्टीत नकार देत असल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे, पोलिसांनी सांगितले. या मुलीला वाचवण्यासाठी पोलीस बीट मार्शल २ चे अंमलदार नितीन वरे यांनी देखील नदीत उतरून अग्निशमन दल व गावकऱ्यांना मदत करत तिचा जीव वाचण्यासाठी सहकार्य केल्याचे सांगितले.
यावर बोलले असता, तिने माझे आई बाबा मला सतत या न त्या गोष्टींसाठी नकार देत असतात. इथे जाऊ नको, हे करु नको, याच्याशी बोलू नको सतत नकार नकार यामुळे मी घरात सतत मानसिक तणावात वावरत होते.
मात्र आता मला हे सगळं सहन होत नसल्याने मी स्वतः ला च संपवण्याचा विचार केला आणि रात्री मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता वालीवली येथील पुलावरुन नदीत उडी मारली. कोणीतरी माझ्या आई बाबांना समजवा की, मला या सगळ्याचा खूप त्रास होतो अश्या आर्त स्वरात तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
रात्री साधारण ९ च्या सुमारास एका तरुणीने पुलावरून नदीत उडी मारल्याचा फोन आला. लगेचच आपले पथक घेऊन नदीवर आल्यावर तिथली परिस्थिती कठीण होती. अंधार खूप असल्याने रेस्क्यु करणे आवहानात्मक होते. अखेर जवळच्या एरंजाड गावातील रहिवासी रेस्क्यु टीम चे सदस्य मनोहर मेहेर यांच्या सह आम्ही या तरुणीला वाचवले. त्यातच नदीचा भाग या ठिकाणी खूप खोल आहे मात्र जलपर्णी असल्याने, तरुणी त्यात अडकून पडली आणि तिला वाचवता आले.
अग्निशमन दलातून तरुणी नदीत पडल्याची माहिती मिळाली मदत लागणार हे कळताच जवळच्या सहकाऱ्यांना आणि रेस्क्यु साठी लागणारे साहित्य घेऊन नदीवर पोहचलो. आधीच नदी या भागात खूप खोल आहे. त्यात जलपर्णी आणि वर रात्रीची वेळ असल्याने, अंधार या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत काम करताना अडचण आली मात्र, जीवाची पर्वा न करता हेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. म्हणून दोरीच्या साहाय्याने नदीत उतरलो आणि कसंबसं जलपर्णीत अडकलेल्या मुलीला वर खेचून आणले. तिचा जीव वाचला याचेच मनाला खूप समाधान आहे.
मनोहर मेहेर, गावकरी एरंजाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.