Akshay Shinde ESakal
मुंबई

Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी?

Amit Ujagare (अमित उजागरे)

बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलीस कर्चचाऱ्यासह आरोपीचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. सामटीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या आहेत. यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर आहे. यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत. 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता.

बदलापूर येथील एका खासगी शाळेतील दोन चार वर्षीय चिमुकल्या मुलींवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडीत मुलीच्या पालकांची तक्रार न घेता पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवल्यानं मोठा गदारोळ माजला होता. या विरोधात बदलापूरकर नागरिक मोठ्या संख्येनं रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं होतं.

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

Akshay Shinde: एन्काऊंटर पूर्वी अक्षय शिंदे आपल्या आईशी शेवटचं काय बोलला?

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला पोलिस नेमकं कुठे घेऊन जात होते? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT