मुंबई

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

संतोष कानडे

Mumbai Crime News: बदलापूरमध्ये दोन अल्पवीयन मुलींवर शाळेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती येत आहे.

वैद्यकीय तपासणीदरम्यान आरोपीने गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं डॉक्टरांसमोर मान्य केलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली असून न्यायालयामध्ये डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीवरुन 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

बदलापूर प्रकरणात पोलिसांनी विशेष न्यायालयात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात आरोपीने वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरकडे कबुली दिल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांचा आणि आरोपीचा जबाब नोंदवला आहे. कोर्टामध्ये हे स्टेटमेंट महत्त्वाचं ठरणार आहे. यासह वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट आणि शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे जबाबही महत्त्वाचे ठरणार आहेत.

नेमकं काय घडलं?

बदलापूरमध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला. शाळेत कर्मचारी असलेला नराधम अक्षय शिंदे याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि २० ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशन मध्ये १० तास रेल रोको आंदोलन झाले. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याचे काम सुरु करण्यात आले.

खटला सुरु असलेल्या कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूममध्ये पीडित तीन आठवड्यांपूर्वी मुलींसमोर आरोपीची ओळख परेड पार पडली . विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती, मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Mutual Fund: एलआयसीची मोठी घोषणा; गुंतवणूकदारांसाठी आणणार 100 रुपयांची SIP, काय आहे प्लॅन?

IND vs BAN 1st Test : 'भाई, इधर एक फिल्डर आएगा...'; Rishabh Pant ने बांगलादेशची फिल्डिंग सेट केली Video Viral

Manoj Jarange Patil: मध्यरात्री जरांगे यांना ४ सलाईन, आंतरवाली सराटीत नक्की काय घडलं? या कारणामुळे झाला मराठा-ओबीसी वाद !

नियम पाळून, टॅक्स भरून त्यांना काय मिळतं तर... प्रियदर्शन जाधवने मांडली मुंबईकरांची दुखरी बाजू

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

SCROLL FOR NEXT