Akshay Shinde ESakal
मुंबई

Akshay Shinde: अंत्यसंस्काराविरोधात बदलापूरकर आक्रमक, मात्र अक्षयच्या घरी नातेवाईकांची गर्दी, अंत्यविधी होण्यावर प्रश्नचिन्ह

Vrushal Karmarkar

मोहिनी जाधव, बदलापूर: बदलापूर येथे घडलेल्या दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार घटनेतील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. मात्र बदलापूर येथे या नराधमाचे अंत्यसंस्कार होऊ नये आणि आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका बदलापूरच्या काही नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होतील का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी सर जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. आता शवविच्छेदन झाल्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यापूर्वी आपल्या मुलाचा जाणून बुजून एन्काऊंटर करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर मुलाच्या एन्काऊंटरची चौकशी व्हावी अशी मागणी करत तो पर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका अक्षय शिंदे यांच्या पालकांनी घेतली होती.

मात्र आज अक्षय शिंदेचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. असे असताना, बदलापूर शहरात त्याचे राहते घर जे आंदोलनाच्या दिवसापासून बंद होते ते आज उघडण्यात आले आहे. या ठिकाणी अक्षय शिंदे याचे नातेवाईक यायला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, अक्षय शिंदेच्या घराबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

असे असताना, बदलापूर शहरात घडलेल्या घृणास्पद प्रकाराने बदलापूरकर आजही संतप्त असून, अक्षय शिंदेच्या मृतदेहावर शहरात अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बदलापूर शहरातील काही नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार बदलापुरात होणार का? यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

Pune Rain : नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी झाले चिखलाचे साम्राज्य

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

SCROLL FOR NEXT