मुंबई

तब्बल १४ वर्षानंतर 'ती' पुन्हा येतेय..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - २०१६ मध्ये बजाज कंपनीने आपली लोकप्रिय 'चेतक' ही स्कुटर बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर स्कुटर प्रेमींमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली होती. बजाजकडून घेतलेला निर्णय अनेक स्कुटर प्रेमींसाठी मोठा झटका होता. अशात आता बजाज एक चांगला झटका आपल्या ग्राहकांना देणार आहे. कारण तब्बल चौदा वर्षानंतर बजाजची 'चेतक' स्कुटर परत येतेय. आता लाँच होणारी 'चेतक' ही इलेक्ट्रिक स्कुटर असणार आहे.    

आज मुंबईत 'बजाज चेतक'च्या इलेक्ट्रिक स्कुटरचं लॉन्चिंग झालं. या बाईकचा फर्स्ट लूक १६ ऑक्टोबररोजी अधिकृतरीत्या सर्वांसमोर आला होता. लॉन्चिंग नंतर 'चेतक'ची विक्री पुण्यातून सुरु होणार आहे. यानंतर बेगळुरु आणि त्यानंतर सर्व देशभरात कंपनी स्कुटरची विक्री सुरु करणार आहे.    

किंमत किती ? 
या स्कुटरच्या अधिकृत किंमत किमतीबद्दल अद्याप समोर आलेली नाही. मात्र या इलेकट्रीक स्कुटरची किंमत ९० हजार ते १.५ लाखांपर्यंत असू शकते.  

बुकिंग कसं कराल ? 

ही स्कुटर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बुक करू शकतात. ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्हाला  https://www.chetak.com/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज डिलरकडे देखील 'चेतक' बुक करू शकतात 

फीचर्स काय आहेत ?

  • 'बजाज चेतक' दोन व्हेरिएंट्समध्ये येणार आहे, यामध्ये तुम्हाला इको आणि स्पोर्ट्स हे दोन मोड मिळतील.
  • 'इको'मोडमध्ये गाडी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ९५ किलोमीटर चालू शकेल 
  • 'स्पोर्ट्स'मोडमध्ये चेतक स्कुटर ८५ किलोमीटर चालू शकेल 
  • ही स्कुटर सहा वेगवेगळ्या रंगांमध्ये येणार आहे   
  • या स्कुटरमध्ये मोठं डिजिटल स्पीडोमीटर त्याचसोबत मॅप्सचा डिसप्ले  ब्लूटूथच्या माध्यमातून स्पीडोमीटरवर पाहता येऊ शकतो.  
  • यामध्ये इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टमदेखील असणार आहे 
  • याचसोबत या स्कुटरच्या दोन्ही चाकांना डिस्कब्रेक असणार आहेत 
  • या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये LED हेड आणि टेल लाईट्स असणार आहे
  • नवीन चेतकमध्ये फिक्स्ड टाइप Li-Ion बॅटरी असणार आहे 
  • ग्राहकांना होम चार्जिंग ऑप्शन देखील देण्यात आलाय 

१९७२ मध्ये चेतक स्कुटर भारतात लॉन्च झाली. त्यानंतर तब्बल तीन दशकं या स्कुटरचा भारतीय बाजारपेठेत बोलबाला राहिला. २००६ साली कंपनीने 'चेतक'ची निर्मिती बंद केली.आता तब्बल १४ वर्षानंतर आता बजाज पुन्हा एकदा चेतक घेऊन आलीये नव्या रंगात आणि नव्या ढंगात. 

bajaj chetak scooter is relaunched in mumbai check specification and price 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT