bajaj finance q1 results net profit rises 32 on year to rs 3437 crore asset quality improves esakal
मुंबई

Bajaj Finance : ‘बजाज फायनान्स’च्या निव्वळ नफ्यात ३२ टक्के वाढ

ऑपरेशन्समधील एकूण महसुलात जवळपास ३५ टक्के वाढ झाली असून, तो १२,४९८ कोटी रुपये झाला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बजाज फायनान्स लि. ने जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ३,४३७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळवत, त्यात वार्षिक ३२.४ टक्के वाढ नोंदवली आहे. ऑपरेशन्समधील एकूण महसुलात जवळपास ३५ टक्के वाढ झाली असून, तो १२,४९८ कोटी रुपये झाला आहे.

कंपनीने आज तिमाही आर्थिक निकाल जाहिर केले, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या तिमाहीत निव्वळ व्याजउत्पन्न २६ टक्क्यांनी वाढून ८,३९८ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत ते ६६४० कोटी रुपये होते.

या तिमाहीतील कर्जांची संख्या वर्षभरात ३४ टक्क्यांनी वाढून ९९ कोटी झाली असून, एका तिमाहीतील आतापर्यंतची सर्वाधिक कर्ज संख्या आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता या तिमाहीत २.७० लाख कोटी रुपये असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते २.४० लाख कोटी रुपये होते. मालमत्तेतील ही वाढ ३२ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात व्यवस्थापनाखालील मालमत्तेत एकूण २९ ते ३१ टक्के वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जून तिमाहीअखेरीस एकूण अनार्जित कर्जांचे प्रमाण अर्थात एनपीए ०.८७ टक्के होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते १.२५ टक्के होते. निव्वळ एनपीए वर्षापूर्वीच्या ०.५१ टक्क्यांवरून ०.३१ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. या तिमाहीत कंपनीचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर २४.६१ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT