balasaheb thackeray eknath shinde anand dighe esakal
मुंबई

Shivsena Rebel: बाळासाहेब म्हणाले, दिघेंना धर्मवीर बनवून ठेवलं आणि ठाण्याची सत्ता गेली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाणे महानगरपालिकेतील अपयशाचं खापर थेट भाजपवर फोडताना दिसतात.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध केलेलं बंड म्हणजे राज्यात आलेला राजकीय भूकंपच ठरलाय. जवळपास ५० आमदारांचा पाठिंबा असणारे एकनाथ शिंदे हे भाजप बरोबर हातमिळवणी करणार की पुन्हा अनेक उलथापालथी घडवून आणणार याची चर्चा सुरु आहे. या राजकीय भूकंपाची सुरवात धर्मवीर या सिनेमापासून झाली असं म्हटलं जातं. (Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray)

एक साधा शिवसैनिक ते आज राज्यातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असणारे एकनाथ शिंदे हे धर्मवीर कै आनंद दिघे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. ठाण्यात शिवसेना रुजवण्याचं श्रेय आनंद दिघे यांना दिलं जातं. ठाणेकर आजही दावा करतात की शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीला हादरा देईल एवढी लोकप्रियता आनंद दिघे यांनी कमावली होती. मात्र खुद्द आनंद दिघे बाळासाहेबांना आपला गुरु मानायचे. आनंद दिघे आणि ठाकरे कुटूंबीय यांच्यात शीतयुद्ध असल्याचं अनेकदा बोलून दाखवलं जात असलं तरी ते वाद कधी समोर आले नाहीत.

अपवाद फक्त एका मुलाखतीचा ज्यात बाळासाहेबांनी आनंद दिघे यांच्यावर थेट टीका केली होती.

balasaheb thackeray anand dighe

१९९२ साली संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे घेतलेल्या मुलाखतीला पार्श्वभूमी होती छगन भुजबळ यांच्या बंडखोरीची. शिवसेनेत यापूर्वी कधीही बंड झालं नव्हतं मात्र छगन भुजबळ यांच्या निमित्ताने पक्षातील अस्वस्थता समोर येऊ लागली होती. मनोहर जोशी, आनंद दिघे, भाजप बरोबर मोडलेली युती अशा अनेक विषयांवर बाळासाहेबांनी दिलखुलास उत्तरे दिली होती. यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना ठाणे महानगरपालिकेत झालेल्या पराभवा बद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं,

धक्के बसतातच हो। सुंदर घर बांधावं आणि भूकंप झाला. घर पडलं. काय करणार? ठाण्यातलं राजकारण निराळं होतं. मीसुद्धा काही समाधानी आहे ठाण्याच्या बाबतीत असं बिल्कुल नाहीय. मी आनंद दिघेलासुद्धा बोललोय त्याबाबतीत. त्याला जास्त बिघडवणारा कुणी असेल तर नावानिशी त्याचा उल्लेख करतो तो म्हणजे अनिल थते. त्या अनिल थतेनी त्याला बिघडवलेला आहे. त्याला ते धर्मवीर आणि आणखी काही करून... हयात त्याची विघ्नसंतोषीच वृती आहे. तसा आनंद हा अगदी कडवट निष्ठावंत. काहीतरी कुठेतरी दबावाखाली येतो. त्याचे काही ओलावे आहेत. तो डाव खेळण्यात चुकला असेल,

बाळासाहेबांच्या या उत्तरावर संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की कोणते डाव म्हणता तुम्ही? त्यावर बाळासाहेब म्हणतात,

मला मुळामध्ये ठाण्यात बी.जे.पी. शी का संगनमत नको होतं? बी.जे.पी. ही जागा वाढवते आणि मग कुठेच आपल्याला उपयोगी पडत नाही. आज काय झालय की, त्यांची एकच वीणा भाटिया होती. पण आज युतीमध्ये त्यांचे दहा आले आणि आमचे कमी झाले. मग मी आनंदला सांगितलं की, तू डावपेचात कमी पडलास, मी ती मम म्हणायची. इथपर्यंत मी स्वातंत्र्य दिलं. ही युती तुला हवी म्हणून मी दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाणे महानगरपालिकेतील अपयशाचं खापर थेट भाजपवर फोडताना दिसतात. त्यांच्यात आणि आनंद दिघे यांच्यात काही मतभेद होते याचंच उदाहरण म्हणजे ही मुलाखत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT