BMC sakal media
मुंबई

म्हाडा, एमआयजीच्या वादात महापालिकेची उडी; जाणून घ्या प्रकरण

एमआयजी जवळील शाळा बांधून देण्याचे महापालिकेचे म्हाडाला पत्र

तेजस वाघमारे

मुंबई : वांद्रे पूर्वेकडे (bandra) एमआयजी क्लबसाठी (MIG club) जागा भाडेतत्त्वावर (land on lease) देताना म्हाडा (mhada) आणि एमआयजी क्लबमध्ये करार (agreement) पूर्णत्वास आला होता. त्यानुसार क्लब जवळील एमआयजी क्लबने माध्यमिक शाळेसाठी (land reserve ) आरक्षित असलेल्या भूखंडावर विनामूल्य शाळा (school) बांधून देण्याचा कबूल केले आहे. मात्र या शाळेच्या क्षेत्रफळावरून एमआयजी क्लब आणि म्हाडामध्ये जुंपली आहे. या वादात आता महापालिकेने (bmc) उडी घेतली असून येथील शाळा म्हाडाने बांधून ताब्यात द्यावी असे पत्र महापालिकेने म्हाडाच्या मुंबई मंडळाला पाठवले आहे.

वांद्रे पूर्वेकडे एमआयजी क्लब असून त्यात क्रिकेटचे मैदान आणि बाजूला क्लब ची इमारत आहे. म्हाडाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या क्लबसाठी भाडेतत्त्वावरील धोरण अवलंबण्यात आले आहे. भाडेतत्त्वावर देताना म्हाडा आणि एमआयजी क्लबमध्ये करार झाला होता. त्यातील अटी, शर्तींमध्ये एमआयजी क्लबने माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर विनामूल्य शाळा बांधण्याचा समावेश आहे. या भूखंडांवरील शाळा अभिनव संस्थेमार्फत चालविण्यात येत होती. कालांतराने येथे नवजीवन संस्थेला महापालिकेने ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे.

म्हाडा आणि एमआयजीमध्ये २००४ मध्ये करार झाला असून त्यातील 3 (ब) नुसार शाळेची इमारत विनामूल्य स्तरावर बांधली जाणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने बराच गदरोळही झाला होता. यासंदर्भात, म्हाडाने कठोर पावले उचलत एमआयजी क्लबवर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारीमध्ये म्हाडा प्राधिकरण बैठकीतही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या पहिल्या नोटिसीमुळे क्लबसमोर दंड म्हणून 53 कोटी 65 लाख रुपये रक्कम भरणे वा शाळेची इमारत बांधून देणे यापैकी एकाचा पर्याय निवडणे अपेक्षित होते.

त्यानुसार एमआयजी प्रशासनाने शाळेच्या भूखंडांवर बांधकाम सुरू केले. त्याला म्हाडाने आक्षेप घेतला आहे. म्हाडाची परवानगी न घेता एमआयजी क्लबने बांधकाम केल्याचा दावा म्हाडाने केला आहे. या प्रश्नी म्हाडा, एमआयजी प्रशासन आणि महापालिकेची बैठक झाली. यामध्ये एमआयजीने म्हाडाला याठिकाणी शाळेसाठी 20 खोल्या देण्याची तयारी दर्शविली. तर म्हाडाने 14 हजार क्षेत्रफळ बांधकाम शाळेसाठी देण्याची मागणी लावून धरली आहे.

या वादातच आता नवजीवन संस्थेनेही जागेची किंमत घेऊन भूखंड देण्याची मागणी म्हाडाने केली आहे. शाळेचा वाद सुटला नसतानाच आता महापालिकेने म्हाडाला पत्र पाठवून सीबीएसई शाळेसाठी बांधकाम करून देण्याची मागणी केली आहे. यामुळे या शाळेचा वाद आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. क्लब जवळील भूखंड शाळेसाठी राखीव असल्याने क्लबने तेथे शाळा बांधून देणे बंधनकारक आहे. ही शाळा पालिकेकडे म्हाडा देईल. महापालिकेने शाळेबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे, म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT