bandra worli sea link sakal
मुंबई

Sea Link : वांद्रे-वरळी सी लिंकवर लवकरच स्वयंचलीत टोल यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल प्लाझावर महिनाभरात अत्याधुनिक टोल कलेक्शन यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे सी लिंकवरील प्रवासापेक्षा अधिक टोल नाक्यावर लागणारा वेळ कमी होणार असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदरच्या यंत्रणेसाठी सुमारे चार कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे.

पश्चिम उपनगरातील बहुतांश वाहनधारक दक्षिण मुंबईत जाण्यासाठी सर्रासपणे वांद्रे-वरळी सी लिंकचा वापर केला जातो. मात्र टोल संकल यंत्रणा जुनी असून रोखीनेही टोल संकलित केला जातो. त्यामुळे वाहनधारकांना टोलच्या ठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

त्याची एसएसआरडीसीने दखल घेतली असून जून अखेरपर्यंत शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसारखी स्वयंचलित टोल संकलन यंत्रणा बसवणार आहे. त्यामुळे वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. दरम्यान सध्याच्या टोल कलेक्शन यंत्रणा जुनी झाली असल्याने त्यामध्ये सातत्याने बिघाड होतो. त्यामुळे त्याची वारंवार दुरूस्ती करावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT