मुंबई

पनवेलमध्ये शेकाप विरोधात बॅनरबाजी! ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले

दीपक घरत

पनवेल -  कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत करा आणि मग मत मागायला या अशी शेकाप नेत्यांवर टीका करणारे अनामिक फलक नवीन पनवेल उड्डाणपुलावर लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावले गेले असल्याचे बोलले जात आहे. अनामिक बॅनरबाजी करून विरोधी पक्षाला डिवचण्याचे प्रकार मुंबई महापालिका हद्दीतील मतदारांकरिता नवे नाहीत. विशेषतः शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून एखाद्या घटनेवर मार्मिक टीका टिप्पणी करणारे अनामिक बॅनर मुंबई परिसरातील विरोधी पक्षाच्या कार्यालयाबाहेर नेहमीच झळकावले जातात मात्र रात्रीच्या अंधारात झळकावण्यात येणाऱ्या आशा बॅनर वर लावणाऱ्यांचे नाव मुद्दामून छापले जात नसले तरी बॅनर लावण्यामागचा लावणाऱ्याचा हेतू नेहमीच साध्य होत असल्याने आता हे लोन पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत पोहोचले आहे.

तालुक्यातील 24 ग्रामपंचायत निवडणुकी करता 15 जानेवारी रोजी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्या करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात करण्यात आली आहे. एकेकाळी तालुक्यातील राजकारणावर मजबूत पकड असलेला शेकाप शहरी भागातील राजकारणात काही प्रमाणात कमजोर पडला असला तरी ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतीनवर शेतकरी कामगार पक्ष आपले वर्चस्व टिकवून आहे. शेकाप चे उरलेले हे वर्चस्व नष्ट करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत असून, कर्नाळा बँकेत घडलेल्या कथित घोटाळ्याच्या पार्शवभूमीवर शेकाप नेत्यांच्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी कर्नाळा बँकेच्या उल्लेखाचे बॅनर लावून शेकाप नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न भाजपा कडून केला जात असल्याची चर्चा पनवेल परिसरात आहे. नवीन पनवेल परिसरात ज्या ठिकाणी बॅनर बाजी करण्यात आली आहे त्या परिसरात कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांचे वास्तव्य असून,15 जानेवारी रोजी निवडणुका असलेल्या अनेक ग्रामपंचायत देखील नवीन पनवेल - माथेरान रोड वर असल्याने बॅनरबाजी करण्यासाठी हे ठिकाण निवडले गेले असण्याची शक्यता आहे.

Banner waving against shetkari kamgar paksh in Panvel 

----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT